पुणे-बुलढाणा जिल्हा येथे झालेले दलित चर्मकार समाजातील महिलेला मारहाण करून गावामध्ये विवस्त्र धिंड काढलेल्या जातीयवादी मानवतेला काळिमा फासणारे गावगुंडांना कठोर शासन करावे अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पुणे शहराचे अध्यक्ष राजाभाऊ पोटे यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट व पुणे जिल्हाधिकारी सौरव राव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .
बुलढाणा येथील रुईखेड या गावामध्ये दलित चर्मकार समजातील महिलेला नालायक गावगुंडांकडून अमानुषपणे मारहाण व विवस्त्र करून धिंड काढण्यात आली . या हल्ल्यातील सर्व नराधमांना कठोर शासन करण्यात यावे . येथून पुढे कोणीही असे कृत्य करून नये अन्यथा दलितांचा क्रोध अनावर होऊन शासनाला याची किंमत भोगावी लागेल असा इशारा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पुणे शहराचे अध्यक्ष राजाभाऊ पोटे यांनी केली आहे . या निवेदन देतेवेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदाम लोखंडे , राज्य कार्यकारिणी सदस्य उत्तरेश्वर कांबळे , गटई सेल अध्यक्ष तुळशीराम साळुंके ,गटई सेल सरचिटणीस सूर्यकांत भोसले , उत्तम गगणे , गोपीचंद कदम , दत्ता यादव , दत्तू वाघमारे , गोपाळ वाघमारे व मोठ्या संख्येने चर्मकार समाज बांधव उपस्थित होते . येत्या शुक्रवारी १६ जून २०१७ रोजी बुलढाणा येथील रुईखेड येथील घटनेच्या ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे . या मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील जनता , संघटनेतील पदाधिकारी व चर्मकार समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत . अशी माहिती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पुणे शहराचे अध्यक्ष राजाभाऊ पोटे यांनी दिली .