पुणे(राम शेडगे)-प्रसिद्ध पार्श्वगायक व संगीतकार व सध्या अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेला अभिनेता अंकित तिवारीला मराठी चित्रपटात पार्श्वगायन करायचे आहे. ‘बद्तमीज ’ या त्याच्या नवीन अल्बमच्या प्रोमोशनसाठी तो नुकताच पुण्यात आला होता. त्यावेळी आयोजित केलेल्या सीजन मॉल येथिल पत्रकार परिषदेत त्यांने त्याची ही इच्छा बोलून दाखवली. मराठी चित्रपट सध्या १०० कोटीच्या क्लबमध्ये आहे. सातासमुंद्रापार मराठीची घोडदोड असताना आपला ही आशयघन असलेल्या मराठी चित्रपटसृष्टीत खारीचा वाटा असावा असे त्याने त्याच्या मनातील इच्छा व्यक्त केली. या वेळी अंकित तिवारी, दिग्दर्शक सिद्धांत सचदेव व सीजन मॉलचे महाव्यवस्थापक अजय मल्होत्रा यावेळी उपस्थित होते.
टी – सिरीज व बी एच एनटरटेंमेंट यांची निर्मिती असलेल्या या व्हिडीओ अलबमचे दिग्दर्शक सिद्धांत सचदेव हे असून संगीत व गायन अंकित तिवारी, तर छायाचित्रण सुनील पटेल, गीत मनोज मुनताशीर यांचे असून अंकित तिवारी व सोनल चौहान या दोघांचा अभिनय या व्हिडीओ अल्बममध्ये आपणास पाहायला मिळेल.
यावेळी दिग्दर्शक सिद्धांत सचदेव म्हणाले, की या व्हिडीओ अल्बमसाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. या अल्बमचे चित्रीकरण आम्ही मुंबई व गोवा या ठिकाणी केले असून या व्हिडीओ अल्बममधून गायक अंकित तिवारीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्याच बरोबर सोनल चौहान व अंकित तिवारीची केमिस्ट्री खूप छान जुळली आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणात तरुणाई आहे. या तरुणाईला हा अल्बम नक्कीच आवडेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.