पुणे -पुण्यातील सराफ व्यवसायिक मराठे ज्वेलर्सचे मालक मिलिंद उर्फ बळवंत (वय 60) यांनी छातीत गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.आर्थिक अडचण आणि नुकसान या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.
\पोलिसांनी याप्रकरणी सांगितले कि, , मिलिंद मराठे हे प्रसिद्ध सराफ व्यवसायिक आहेत. लक्ष्मी रस्त्यावर त्यांचे मराठे ज्वेलर्सचे दुकान आहे. दरम्यान त्यांनी आज साडे सात वाजण्याच्या सुमारास दुकानातच पिस्तुलमधून छातीत गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दुकानातील कामगारांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस देखील रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत होते.

