‘ स्वातंत्र्यवीरायण ‘ च्या सादरीकरणाला पुणेकरांचा उस्फुर्त प्रतिसाद
पुणे :
‘ पुण्यातील युवा रंगकर्मींनी एकत्र येऊन केलेल्या ‘ स्वातंत्र्यवीरायण ‘ या स्वातंत्र्यवीर वि. दा . सावरकर यांच्या जीवनगाथेवरील नाटकाच्या सादरीकरणाला शनिवारी पुणेकरांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला .
प्रसिद्ध युवा कलाकार अथर्व कर्वे दिग्दर्शित या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शनिवारी दुपारी भरत नाट्य मंदिर येथे झाला .
माजी खासदार प्रदीप रावत ,प्रतिभा शाहू मोडक ,सुनील महाजन ,दीपक बीडकर ,नूमवि प्रशालेच्या मुख्याध्यापक संजीवनी ओमासे ,निर्माता डॉ . डी . एन . गुंडेवार ,स्वप्नील फुगे ,अरविंद कोटस्थाने आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला .
नूमवि प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक संजीवनी ओमासे यांनी अथर्व कर्वे यांचा सत्कार केला . कलाकारांचाही सत्कार करण्यात आला .
नाटकाचे लेखक अथर्व देशपांडे ,शार्दूल अनसिंगकर असून दिग्दर्शन अथर्व कर्वे याने केले आहे . डॉ . डी . एन . गंजेवार हे निर्मिता आहेत .
अथर्व कर्वे, ऐश्वर्या तुपे, आदित्य बीडकर, पूर्वा देशपांडे, ऋत्विक व्यास, अमित कुलकर्णी, सोहम देवधर ,पार्थ कुलकर्णी, ऋत्विक व्यास ,राजस कुलकर्णी यांच्या भूमिका या नाटकात आहेत . नेपथ्य सोनम चव्हाण यांचे असून वेशभूषा पूर्वा देशपांडे यांची आहे .
पुढील प्रयोग यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे ३० एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता असल्याची माहिती यावेळी देण्यात आली