अरुण गवळी १० मे पर्यंत जेलबाहेर

Date:

मुंबईः माजी आमदार, अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १० मे पर्यंत जेल बाहेर राहण्यास सशर्त परवानगी दिली आहे. जेल बाहेर असताना कायद्याचे पालन करणे, पॅरोलच्या नियमांचे तंतोतंत पालन करणे अशा अटी त्याला घालण्यात आल्या आहेत.

शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर मध्यवर्ती तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळीला नागपूर खंडपीठाने १३ मार्च रोजी ४५ दिवसांची पॅरोलची रजा दिली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार गवळीला २७ एप्रिलला तुरुंगात हजर व्हायचे होते. मात्र देशात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अरुण गवळीने पॅरोलची रजा वाढवून मागण्यासाठी अर्ज सादर केला. या अर्जावर नागपूर खंडपीठाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेतली. सुनावणीसाठी अरुण गवळी मुंबईतून हजर होता

आधीच्या सर्व फर्लो आणि पॅरोलच्या रजांचा कालावधी संपण्याच्या दिवशी तुरुंगात परतल्याचे कारण देत अरुण गवळीने ताज्या परिस्थितीची माहिती वकिलामार्फत नागपूर खंडपीठाला दिली. देशभर लॉकडाऊन सुरू आहे. मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीत मुंबईत घराबाहेर पडणेच कठीण झाले आहे. घरातून बाहेर पडून कोरोना पसरवण्यास कारणीभूत ठरू नये यासाठी घरातच आणखी काही दिवस राहू द्यावे अशी विनंती गवळीने केली. त्याने पॅरोलची रजा वाढवून मागितली. अर्जदाराची वागणूक, त्याने आधीच्या फर्लो आणि पॅरोलच्या रजांच्या काळात तुरुंगाबाहेर केलेले वर्तना याचा रेकॉर्ड तपासून न्यायालयाने निकाल दिला. अरुण गवळीला १० मे पर्यंत तुरुंगाबाहेर राहण्याची परवानगी मिळाली.

पत्नीच्या आजारपणाचे कारण पुढे करुन मागील काही वर्षांमध्ये वारंवार अरुण गवळीने फर्लो किंवा पॅरोलच्या रजा घेतल्या आहेत. यावेळीही गवळी पत्नीसाठीच तुरुंगाबाहेर आला. तुरुंगाबाहेर असताना त्याने बेकायदा वर्तन केल्याची नोंद आढळलेली नाही. ही बाब गवळीचे  वकील अॅडव्होकेट मीर नगमान अली यांनी न्यायालयासमोर मांडली. सर्व बाजू ऐकून घेऊन न्यायाधीश विनय जोशी यांनी अरुण गवळीच्या पॅरोलची मुदत वाढवली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...