पुणे :हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील आदर्श उत्तरांची माहिती व्हावी, यासाठी पाच वर्षांतील सोडविलेल्या उत्तरपत्रिकांचे पुस्तक आता विद्यार्थ्यांच्या दिमतीला येत आहे.पुस्तकाचे प्रकाशक ‘मीडिया फॉर यू’ असून, लेखक रिदम वाघोलीकर ,प्रतिक रोकडे, अनुराधा करमरकर यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे.
तसेच पुणे विद्यापीठाच्या हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाचे आणि ‘ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी (AISSMS) संस्थेच्या कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजीचे माजी विद्यार्थी यांचा या पुस्तकाच्या लेखनात सहभाग आहे. तर या पुस्तक निर्मितीमध्ये अनुराधा करमरकर यांनी प्रकल्प समन्वयक म्हणून काम पाहिले आहे.प्रा. सोनाली जाधव (प्राचार्य, ‘ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी , कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी) यांनी पुस्तकाचे संपादन केले आहे.