मुंबई: प्रतिक नावाच्या व्यक्तीला केलेय मारहाणप्रकरणात बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोलीला अंधेरी न्यायालयाने एक वर्षांची शिक्षा आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.मात्र आदित्य पांचोली शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात अपील करणार आहे. त्यामुळे जामीन मंजूर झाला असून, त्याची जेलवारी टळली आहे.आदित्य पांचोलीने 2005 साली सोसायटीच्या पार्किंगमध्ये एका व्यक्तीला मारहाण केली होती. याप्रकरणी प्रतिक नावाच्या व्यक्तीने आदित्य पांचोलीविरोधात गुन्हा दाखल केला होता.