महिन्यात देशांतर्गत विक्रीमध्ये 14% वाढ
मुंबई- 19 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या, महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या फार्म इक्विपमेंट सेक्टरने (एफईएस) मे 2018 मधील ट्रॅक्टरविक्रीची आकडेवारी आज जाहीर केली.
मे 2018 मध्ये देशांतर्गत विक्री 28,199 युनिटची झाली, तर मे 2017 मध्ये ती 24,710 युनिट होती. मे 2018 मध्ये एकूण ट्रॅक्टरविक्री (देशांतर्गत + निर्यात) 29,330 युनिट इतकी झाली, तर गेल्या वर्षी याच काळात ती 25,749 युनिट होती. मेमध्ये 1,131 युनिटची निर्यात करण्यात आली.
मासिक कामगिरीविषयी बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या फार्म इक्विपमेंट अध्यक्ष राजेश जेजुरीकर यांनी सांगितले, “आम्ही मे 2018 मध्ये 28,199 ट्रॅक्टरची देशांतर्गत विक्री केली आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ही संख्या 14 टक्के अधिक आहे. अन्नधान्याचे व फुलशेतीचे चांगले उत्पादन येईल, अशा विक्रमी अंदाजामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होईल व ट्रॅक्टरच्या मागणीला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. निर्यातीच्या बाबतीत आम्ही महिन्यात 1,131 ट्रॅक्टरची विक्री केली व मे 2017च्या तुलनेत 9% वाढ साध्य केली.”
फार्म इक्विपमेंट सेक्टर | ||||||
फार्म इक्विपमेंट सेक्टर | मे | एकत्रित मे | ||||
F18 | F19 | %बदल | F18 | F19 | %बदल | |
देशांतर्गत | 24710 | 28199 | 14% | 49918 | 58083 | 16% |
निर्यात | 1039 | 1131 | 9% | 1982 | 2172 | 10% |
एकूण | 25749 | 29330 | 14% | 51900 | 60255 | 16% |
* निर्यातीत सीकेडीचा समावेश
महिंद्राविषयी
19 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या या कंपन्यांच्या समूहाचा नेहमीच प्रयत्न असतो की, ग्रामीण भागात भरभराट झाली पाहिजे, शहरातील जीवनशैली सुधारली पाहिजे आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढली पाहिजे. त्यामुळे लोकांना चालना मिळून त्यांचा विकास होईल. समूह भारतात युटिलिटी व्हेइकल्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा व व्हेकेशन ओनरशिप यामध्ये आघाडीच्या स्थानी आहे व व्हॉल्युमच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे. कृषिव्यवसाय, एअरोस्पेस, कम्पोनंट्स, सल्ला सेवा, संरक्षण, ऊर्जा, औद्योगिक उपकरणे, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, स्टील, रिटेल, व्यावसायिक वाहने व दुचाकी व्यवसायांतही अग्रेसर आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या महिंद्रामध्ये 100 देशांत अंदाजे 240,000 कर्मचारी आहेत.