पुणे: 20.7 अब्ज डॉलर उलाढाल महिंद्रा समूहाच्या महिंद्रा अँड महिंद्राच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरने (एफईएस) महाराष्ट्रात आपल्या नोवो युवो व जिवो ब्रँडची 4 व्हील ड्राइव्ह (4डब्लूडी) रेंज दाखल केल्याचे आज जाहीर केले आहे. ट्रॅक्टरची किंमत आकर्षक असून, एक्स-महाराष्ट्र, 11.5 लाख रुपयांपासून नोवो 65 एचपी 4डब्लूडी, 7.7 लाख रुपयांपासून युवो 45 एचपी 4डब्लूडी (575 DI) आणि 4.21 लाख रुपयांपासून जिवो 24 एचपी 4डब्लूडी (245 DI) मिळेल. 150 कस्टमर टच पॉइंट्सच्या महिंद्राच्या विस्तृत जाळ्यामार्फत हे ट्रॅक्टर राज्यभर तातडीने उपलब्ध होणार आहेत.
4 व्हील ड्राइव्ह वैशिष्ट्यामुळे निसरड्या किंवा उंचसखल भूपृष्ठावर उत्तम ट्रॅक्शन मिळते व त्यामुळे उत्पादकता वाढते. सर्व 4डब्लूडी ट्रॅक्टरमध्ये प्रगत तंत्रज्ञान समाविष्ट आहे, जसे DiGiSENSE आणि ही वैशिष्ट्ये कार्यामध्ये सोय व सुलभता आणण्याच्या दृष्टीने तयार केली आहेत. तसेच, शेतीच्या कामांसाठी उत्पादकता व कार्यक्षमतेतही वाढ केली जाणार आहे.
यानिमित्त बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे मार्केटिंग, फार्म डिव्हिजनचे उपाध्यक्ष रवींद्र शहाणे यांनी नमूद केले, “महिंद्रामध्ये आम्ही प्रणेते शेती तंत्रज्ञान आणून ग्रामीण भागाच्या भरभराटीला चालना देत आहोत. या तंत्रज्ञानामुळे शाश्वत उत्पादकतेला चालना मिळेल व त्या बदल्यात, शेतीच्या उत्पन्नात वाढ होईल. आमचे प्रगत ट्रॅक्टर तंत्रज्ञान शेतकऱ्यांना शेतीच्या कार्यक्षम पद्धतींचा वापर करण्याची सुविधा देऊन त्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी यशस्वी ठरले आहे.”
शहाणे यांनी सांगितले, “अद्ययावत 4डब्लूडी उत्पादने सादर करताना आम्हाला अतिशय आंनद होत असून त्यामुळे या उद्योगात नवा बेंचमार्क निर्माण केला जाणार आहे. 4डब्लूडी प्रकार आता ट्रॅक्टर्सच्या नोवो, युवो व जिवो ब्रँडमध्ये उपलब्ध असून त्यामुळे ऊस व फुलशेती अशा विविध प्रकारच्या पिकांना शेतीच्या विविध सेवा पुरवल्या जाणार आहेत.”
जवळजवळ 3 वर्षांपूर्वी दाखल करण्यात आलेला नोवो 50-60 एपी श्रेणीमध्ये तंत्रज्ञानाच्या बाबतीत अत्यंत प्रगत आहे. महिंद्रा नोवो अतिशय वैविध्यपूर्ण आहे आणि त्याचा वापर शेतीच्या निरनिराळ्या 40 कामांसाठी केला जाऊ शकतो. युवोतील आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण केल्या जातील – जमिनीच्या मशागतीपासून कापणीपर्यंत, तसेच पाकणीनंतरच्या गरजांपर्यंत.
2 वर्षांपूर्वी दाखल केलेला युवो भारतातील झपाट्याने प्रगती करणारा ट्रॅक्टर ब्रँड ठरला आहे. पूर्णतः स्वतंत्र सुविधेवर तयार करण्यात आलेला आणि विशेष व या उद्योगातील पहिलावहिला 12F+3R फुल कॉन्स्टंट-मेश गिअरबॉक्स समाविष्ट असलेला महिंद्रा युवो अतिशय वैविध्यपूर्ण आहे आणि त्याचा वापर शेतीच्या निरनिराळ्या 30 कामांसाठी केला जाऊ शकतो. युवोतील प्रगत तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण केल्या जातील – जमिनीच्या मशागतीपासून कापणीपर्यंत, तसेच पाकणीनंतरच्या गरजांपर्यंत – आणि शेतकऱ्यांना कामे अधिक, जलद व उत्तम करण्यासाठी मदत करतील.
महिंद्रा जिवो हा अत्यंत वैविध्यपूर्ण ट्रॅक्टर असून त्याचा वापर पिकांची निगा, जमिनीची मशागत व आंतरपिकांची कामे अशा निरनिराळ्या कामांसाठी करता येऊ शकतो. फुलशेती व रो क्रॉप फार्मिंग या श्रेणींच्या नव्या गरजा विचारात घेऊन महिंद्रा जिवोची निर्मिती केली आहे आणि त्याची अरुंद व आटोपशीर रचना व उच्च बळ विचारात घेता तो शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरेल. महिंद्राचा पहिला सब 25HP 4डब्लूडी ट्रॅक्टर म्हणून, हा उच्च कामगिरी करणारा ट्रॅक्टर व या श्रेणीतील सर्वोत्तम टॉर्क व इंधनक्षमता यामुळे तो या श्रेणीत आघाडीवर आहे.
महिंद्रा नोवो
तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगत असलेला महिंद्रा नोवो विविध एचपी क्षमतांमध्ये (49.9, 52, 57, 65 व 75 एचपी) उपलब्ध असून तो सर्व प्रकारच्या वापरांमध्ये व मातीच्या स्थितीमध्ये किमान आरपीएम ड्रॉपसह सातत्यपूर्ण व एकसमान बळ देत राहील. नोवोची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढील आहेत
- 305 एनएम इतके सर्वोच्च टॉर्क व 28% बॅकअप टॉर्क असलेले अतिशय शक्तिशाली इंजिन
- तीन रेंज लिव्हर्स व फुल सिंक्रोमेश ट्रान्समिशन
- वेग 1.7 kmph ते 36 kmph (क्रीपर स्पीड 0.4 kmph पासून)
- 2600 किलो इतकी या श्रेणीतील सर्वाधिक क्षमता
- झटपट लोअरिंगसाठी सर्वाधिक पम्प फ्लो
- 65 HP व 75 HP, मेटॅलिक डीप रेड पेंट
- स्टाइलाइज्ड मेटॅलिक 3 डी डिकॅल
महिंद्रा युवो
12 राज्यांतील ग्राहकांकडून अभिप्राय संकलित करणाऱ्या महिंद्राच्या प्रोजेक्ट टीमने केलेल्या सखोल संशोधनातून व विकास कार्यक्रमातून युवोची निर्मिती झाली आहे. युवो विकसित करण्यासाठी अंदाजे 7000 इनपुट वापरण्यात आले आहेत. त्यानंतर महत्त्वाच्या वापरांचा समावेश करत, 12 राज्यांमध्ये 140,000 तास प्रयोगशाळेतील व कार्यक्षेत्रातील प्रत्यक्ष चाचणीसाठी देण्यात आले.
30 – 45 एचपी या दरम्यानच्या क्षमतेचे ट्रॅक्टर गरजेचे असलेल्या भारतीय शेतकऱ्यांसाठी महिंद्रा युवोमध्ये तंत्रज्ञानविषयक अनेक नवी वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत. कोणत्याही स्थितीच्या मातीमध्ये शेतीची कामे दर्जेदार पद्धतीने करण्याच्या दृष्टीने त्याची निर्मिती केली आहे व 30 प्रकारचे वापर करण्यासाठी त्यामध्ये वैविध्य समाविष्ट केले आहे. त्यामुळे भारतात कोठेही वापरण्यासाठी हा ट्रॅक्टर उपयोगी ठरेल. प्लॅनेटरी ड्राइव्ह व 15 गिअर-स्पीड ट्रान्समिशन असलेले युवो 4डब्लूडीचे शक्तिशाली इंजिन हा ट्रॅक्टर शेतीच्या सर्व प्रकारच्या वापरांसाठी आदर्श बनवते. तांदळासारख्या पिकाच्या लागवडीच्या दृष्टीने ड्रॉप डाउन फ्रंट अॅक्सलची निर्मिती केली आहे. |
|
ज्यादा जल्दी बेहतर परफॉर्मन्स या युवोच्या आश्वासनाला 4डब्लूडी प्रकारामुळे चालना. युवोमध्ये अनेक खास वैशिष्ट्ये असून ती पुढीलप्रमाणे आहेत:
|
महिंद्रा जिवो
महिंद्रा जिवो हा 25HP श्रेणीतील अत्याधुनिक, दर्जेदार तंत्रज्ञान असलेला लहान ट्रॅक्टर प्लॅटफॉर्म आहे. 24HP इतकी इंजिनाची क्षमता व PTO power of 22HP इतकी पीटीओ क्षमता यामुळे जिवो रो क्रॉप व फुलशेतीसाठी साजेसा आहे.
महाराष्ट्रातील वाइनयार्डमध्ये जिवो यशस्वीपणे दाखल केल्यानंतर व त्याची कामगिरी सिद्ध झाल्यानंतर, जिवो आता पश्चिम बंगालमध्येही दाखल केला जाणार आहे. जिवो हा आटोपशीर, 24 HP 4डब्लूडी ट्रॅक्टर असून, सर्वोत्तम पीटीओ एचपी व इंधनक्षमता, तसेच अतिशय आकर्षक दरात स्टायलिश व आरामदायी डिझाइन ही त्याची खास वैशिष्ट्ये आहेत.
महिंद्रा जिवोमध्ये अनेक खास वैशिष्ट्ये असून ती पुढीलप्रमाणे आहेत
- ऑटोमॅटिक डेप्थ अँड ड्राफ्ट कंट्रोल (एडीडीसी) – जमिनीची मशागत करण्यासाठी आदर्श पर्याय
- 8 फॉरवर्ड + 4 रिव्हर्स ट्रान्समिशन – वेगाचे विविध पर्याय उपलब्ध
- साइड शिफ्ट गिअर्स – ओपन फ्लोअर स्पेस व गिअर बदलणे सोयीचे
- उच्च ग्राउंड क्लीअरन्स – पिकांची देखभाल करण्यास वापरण्यासाठी अतिशय उपयुक्त
- 2 स्पीड PTO – सुधारित रोटॅव्हेटर वापरासाठी
- 750 किलो लिफ्ट क्षमता – उचलण्याची क्षमता या श्रेणीतील सर्वाधिक असल्याने मोठी उपकरणे वापरणे शक्य
- 25 KMPH इतका सर्वोच्च वेग – शेतातील उत्पादनाच्या वाहतुकीसाठी अधिक ट्रिप
- सर्वाधिक पीटीओ क्षमता – वाइनयार्डमध्ये वापर करताना सातत्यपूर्ण स्प्रेइंगसाठी