कोविद- 19 चा उद्रेकाशी लढा देण्यासाठी आर्थिक सेवा पुरवठादारांनी महत्त्वाच्या सेवा अखंडित राहाण्यासाठी पुढाकार घेत काही उपाययोजनांचा अवलंब केला असून ग्राहकांना डिजिटल माध्यमांचा वापर करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.
खासगी क्षेत्रातील विमा कंपनी बजाज अलियान्झ लाइफने आपल्या सर्व योजनांसाठी व्हॉट्स अप सेवा लाँच केल्या असून त्यामध्ये ग्राहकांना प्रत्यक्ष संवाद न साधता 20 सेवांचा लाभ घेता येणार आहे.
ग्राहकांना त्यांच्या व्हॉट्स अप क्रमाकांवरून 8806727272या क्रमांकावर “Hi” असा मेसेज पाठवून त्यांच्या विमा योजनेशी संबंधित 20 पेक्षा जास्त सेवांचा लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांना त्यांच्या विमा योजनेवर व्हॉट्स अपच्या माध्यमातून 24*7 कंपनीच्या एआय अनेबल्ड चॅटबॉट बोईंग आणि सेवा प्रतिनिधीद्वारे लाइव्ह चॅट असिस्टन्स जवळपास सर्व सेवा मिळणार आहे.
नव्याने लाँच करण्यात आलेल्या ग्राहक सेवा उपक्रमाविषयी बजाज अलियान्झ लाइफच्या ऑपरेशन्स आणि कस्टमर एक्सपिरीयन्स विभागाचे प्रमुख – श्री. कायझाद हिरामानेक म्हणाले,‘व्हॉट्सअपची लोकप्रियता आणि वापरण्यातील सोपेपणा लाक्षात घेत ग्राहकांच्या फायद्यासाठी आम्हाला या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध व्हायचे होते. आमच्याशी संवाद साधण्यातून त्यांना जास्तीत जास्त सोयी आणि खरे मूल्य मिळावे असेही आम्हाला वाटत होते. उपलब्ध सर्वसमावेशक सेवांच्या यादीतून ग्राहकांना त्यांच्या समस्या कुठूनही सोडवता येतील व त्यासाठी आमच्या शाखेला भेट देण्याची किंवा फोन करण्याची गरज नाही. आम्ही चॅट बॉट किंवा ग्राहक सेवा प्रतिनिधीच्या माध्यमातून संवादाद्वारे ही सेवा उपलब्ध करत आहोत.’
मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरील एनक्रिप्शनमुळे ग्राहकाकडून मिळालेली व वितरित करण्यात आलेली माहिती गुप्त राखण्यात येते.
बजाज अलियान्झ लाइफतर्फे ग्राहकांसाठी व्हॉट्सअपवर उपलब्ध करण्यात आलेल्या सर्वसमावेशक सेवा
- योजनेची माहिती पहा
- प्रीमियम पेमेंट्स भरा
- फंडाच्या मूल्याचा आढावा घ्या
- प्रीमियम पेमेंटची पावती डाउनलोड करा
- योजनेचा बाँड डाउनलोड करा
- प्रीमियम भरल्याचे प्रमाणपत्र मिळवा
- ऑटो- पेमेंटसाठी नोंदणी करा
- वैयक्तिक तपशील अद्यावत करा
- संपर्क क्रमांकाची माहिती अद्यावत करणे
- ईमेल अड्रेसची माहिती अद्यावत करणे
- पॅनचे तपशीलांची माहिती अद्यावत करणे
- आमच्या शाखा शोधा
- क्लेमची स्थिती जाणून घ्या.
- बोनस स्टेटमेंट पाहा
- अकाउंट स्टेटमेंट पाहा
- क्लेमची स्थिती जाणून घ्या
- सेवेसाठी नोंदवलेल्या विनंतीची स्थिती जाणून घ्या
- प्रीमियम कॅलक्युलेटर
- पॉलिसी सर्व्हिसिंगसाठी कॉल बॅकची विनंती नोंदवा
- नवी योजना खरेदी करण्यासाठई कॉल बॅक विनंती नोंदवा
- बजाज अलियान्झ लाइफशी संपर्क साधा
- एसएमएसद्वारे फंड मूल्य नोंदवा
माहिती तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, घोटाळे रोखणे अशा महत्त्वाच्या कामांसाठी कंपनीने दमदार पायाभूत सुविधा व व्यवसाय अखंडता नियोजन केले आहे.
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शिकेनुसार कंपन्यांनी ग्राहकांना डिजिटल माध्यमांच्या वापरास प्राधान्य देण्याची विनंती केली आहे.