मुंबई: आयसीआयसीआय लोम्बार्ड या भारतातील आघाडीच्या खासगी नॉन-लाइफ इन्शुरन्स कंपनीने विशेष ‘कोव्हिड-19 प्रोटेक्शन कव्हर’ दाखल केले आहे. ही योजना ग्रुप इन्शुरन्स प्रकारामध्ये सादर करण्यात आली आहे. सध्या पसरलेली साथ विचारात घेता, ही योजना हॉस्पिटलायझेशनचा खर्च कितीही असला तरी, कोव्हिड-19 (+ve) चे निदान झाल्यास 100% सम इन्शुअर्ड देणार आहे. “निभाये वादे” (आश्वासने पूर्ण करणे) या ब्रीदनुसार, आपल्या ग्राहकांसाठी या उद्योगातील पहिलेवहिले उपक्रम सादर करण्याच्या आयसीआयसीआय लोम्बार्डच्या प्रयत्नानुसार हे नवे उत्पादन तयार करण्यात आले आहे.
सरकारने अधिकृत केलेल्या कोणत्याही केंद्रामध्ये योजनाधारकाची कोव्हिड-19 साठीची चाचणी सकारात्मक आली तर योजनेच्या कालावधीदरम्यानच्या पहिल्या कोव्हिड-19 निदानासाठी कंपनी योजनाधारकाला संपूर्ण सम इन्शुअर्ड देणार आहे. मात्र, हे वैशिष्ट्य 14 दिवसांच्या सुरुवातीच्या प्रतीक्षा कालावधीच्या अधीन आहे. या योजनेची व्याप्ती भारताच्या भौगोलिक सीमेपुरती मर्यादित आहे आणि ही योजना केवळ भारतीय नागरिकांसाठी आहे.
या हेल्थ कव्हरसाठी 149 रुपये इतका किफायतशीर प्रीमिअम ठरवण्यात आला आहे आणि हे कव्हर 25,000 रुपयांचे विमाकवच देते. तसेच, यामध्ये हेल्थ असिस्टन्स व चॅट/व्हर्च्युअल असिस्टन्स, टेलि-कन्सल्टेशन व अम्ब्युलन्स असिस्टन्स यांचाही समावेश करण्यात आला आहे.
कोव्हिड-19 प्रोटेक्शन कव्हर देत असलेला विशेष फायदा म्हणजे, 18-75 वर्षे वयोगटासाठी असणारे हे कव्हरेज या विषाणूचा प्रामुख्याने परिणाम होत असलेल्या वयस्कर व्यक्तींना संरक्षण देते.
नवीन कोव्हिड-19 कव्हर दाखल केल्याबदद्ल, आयसीआयसीआय लोम्बार्डचे अंडररायटिंग, क्लेम्स व रीइन्शुरन्स चीफ संजय दत्ता यांनी सांगितले, “सध्या पसरलेली कोरोना विषाणूची साथ विचारात घेता, विशेष पद्धतीने तयार केलेले इन्शुरन्स कव्हर उपलब्ध असणे, ही काळाची गरज आहे. हे लक्षात घेऊन, या संदर्भात सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये मदत करण्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्डमध्ये आम्ही हे विशेष कव्हर सादर केले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना ही कोव्हिड-19 प्रोटेक्शन कव्हर पॉलिसी आर्थिक आधार देणार आहे. पहिल्यांदा झालेल्या निदानामध्येच आम्ही 100% सम इन्शुअर्ड विमाधारकाला एकरकमी देणार आहोत. चॅट/व्हर्च्युअल व अम्ब्युलन्स असिस्टन्स या अतिरिक्त फायद्यांचा समावेश करण्यात आल्याने हे कव्हर सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये अतिशय महत्त्वाचे व उपयुक्त ठरणार आहे.”
या योजनेचा कालावधी 1 वर्ष ठरवण्यात आला आहे आणि या योजनेची व्याप्ती भारताच्या भौगोलिक सीमेपुरती मर्यादित आहे. डिसेंबर 31, 2019 नंतर परदेशातील कोणत्याही ठिकाणी प्रवास केलेल्या, तसेच रिस्क इन्सेप्शन डेटपूर्वी किंवा सुरुवातीच्या 14 दिवसांच्या प्रतीक्षा कालावधीमध्ये संशयित कोव्हिड-19 ठरवण्यात आलेल्या किंवा कोव्हिड-19 चे निदान झालेल्या विमाधारकांनाही लोकांनाही या कव्हरमध्ये वगळण्यात आले आहे.
आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि.विषयी
आर्थिक वर्ष 2019 मधील ग्रॉस डायरेक्ट प्रीमिअम इन्कमच्या आधारे ही सर्वात मोठी खासगी नॉन-लाइफ विमा कंपनी आहे. कंपनी ग्राहकांना विविध माध्यमांतून सर्वंकष व वैविध्यपूर्ण उत्पादने देते व त्यामध्ये मोटर, आरोग्य, पीक, आग, वैयक्तिक अपघात, सागरी, मरिन इंजिनीअरिंग व लाएबिलिटी विमा यांचा समावेश आहे.