चेन्नई – आघाडीची स्वतंत्र आरोग्य विमा कंपनी – स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्सने ‘स्टार नोवेल कोरोनाव्हायरस इन्शुरन्स ’ योजना लाँच केली आहे. कोविद- 19 (नोवेल कोरोनाव्हायरस) चाचणी पॉझिटिव्ह आलेल्यांसाठी आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज असलेल्यांसाठी ही योजना लाँच करण्यात आली आहे.
स्टार नोवेल कोरोनाव्हायरस योजना 18 ते 65 वर्ष वयोगटातील विमाधारक आणि सरकारमान्य चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या व कोरोनाव्हायरसमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या व्यक्तीला एकत्रित रक्कम देणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या योजनेमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला असल्यास ते वगळले जाणार नाही.
स्टार नोवेल कोरोनाव्हायरस योजना दोन प्रकारच्या विमा रक्कम पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. 21,000 आणि 42,000 रुपये, अनुक्रमे 459 रुपये प्रीमियम अधिक जीएसटी आणि 918 रुपये प्रीमियम अधिक जीएसटी हे दोन पर्याय मिळणार आहेत. 65 वर्षांपर्यंतच्या कोणालाही www.starhealth.in वर या योजनेची ऑनलाइन खरेदी करता येईल किंवा कंपनीच्या देशभरात पसरलेल्या विमा प्रतिनिधींच्या नेटवर्कच्या माध्यमातून या योजनेची खरेदी करता येईल. त्यासाठी कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी करावी लागणार नाही.
नव्या योजनेविषयी स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लि. चे व्यवस्थापकीय संचालक आनंद रॉय म्हणाले, ‘जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाव्हायरस कोविद- 19 ही जागतिक साथ म्हणून जाहीर केली असून भारतीय नागरिकांनी त्यापासून स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक आहे. स्टार नोवेल कोरोनाव्हायरस योजना कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्यांसाठी, मग त्यांनी देशाबाहेर प्रवास केलेला असो किंवा नसो, त्यांच्यासाठी तयार करण्यात आली आहे. आमचे कोरोनाव्हायरस कवच कोरोनाग्रस्तांना हॉस्पिटलचा खर्च भागवण्यासाठी एकत्रित रक्कम पुरवेल.’
कंपनीच्या इतर सर्व आरोग्य विमा योजनाही कोविद- 19 विरोधात कवच पुरवतात असेही स्टार हेल्थने सांगितले आहे.
स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कं. लि. बद्दल
स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कं.ने 2006 मध्ये भारतातील पहिली स्वतंत्र आरोग्य विमा कंपनी म्हणून आरोग्य, वैयक्तिक अपघात, परदेशी प्रवासासाठीच्या विमा क्षेत्रात काम सुरू केले. दर्जेदार सेवा, नाविन्यपूर्ण उत्पादने आणि ग्राहकांना सर्वोत्तम ते देण्यासाठी आम्ही आमच्या विस्तृत स्त्रोतांचा वापर करतो. स्टार हेल्थ एजंट्स, ब्रोकर्स, ऑनलाइन अशा विविध माध्यमांतून वैयक्तिक, कौटुंबिक आणि कॉर्पोरेट पातळीवर नाविन्यपूर्ण आरोग्य विमा उत्पादने पुरवत आहे. स्टार हेल्थ ही नामवंत बँकान्शुरन्स असून विविध बँकांची गेल्या बऱ्याच काळापासूनची भागीदार आहे. आर्थिक वर्ष 2019 मध्ये स्टार हेल्थने 5412 कोटी रुपयांचा एकूण लेखी प्रीमियम मिळवला आणि 31 मार्च 2019 पर्यंत 1480 रुपयांचे नेटवर्थ कमवत पुढील मार्ग सुकर केला. स्टार हेल्थची कर्मचारी संख्या सध्या 11000 असून संपूर्ण भारतात 500 पेक्षा जास्त शाखा कार्यालये आहेत.