1 लाख BS-VI विक्रीचा टप्पा ओलांडणारा पहिला टू-व्हीलर ब्रँड

Date:

नवी दिल्ली, जानेवारी 24, 2020: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.ने (एचएमएसआय) आपल्या तीन भारत-स्टेज 6 कम्प्लायंट मॉडेल्सनी (अॅक्टिव्हा 125 BS-VI, SP 125 व अॅक्टिव्हा 6G) एकत्रितपणे 1,00,000 युनिटच्या विक्रीचा टप्पा पूर्ण केला असल्याचे जाहीर केले आहे.

BS-VI परिवर्तनामध्ये आघाडी घेत, एप्रिल 1, 2020 या निर्धारित अंतिम मुदतीच्या जवळजवळ अर्ध वर्ष आधीच BS-VI टू-व्हीलरची उपलब्धता करण्यास सुरुवात करणारा होंडा हा पहिला टू-व्हीलर उत्पादक आहे. तेव्हापासून, बाजारात उपलब्ध झालेल्या तीन BS-VI कम्प्लायंट मॉडेल्सची (अॅक्टिव्हा 125 BS-VI, SP 125 व अॅक्टिव्हा 6G) एकमेव टू-व्हीलर उत्पादक असल्याने होंडा आघाडीच्या स्थानी कायम आहे.

होंडाच्या BS-VI उत्पादनांसाठी प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल भारताचे आभार मानत, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.चे सेल्स व मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया यांनी सांगितले, “अंतिम मुदतीच्या जवळजवळ सहा महिने अगोदरच टू-व्हीलर उद्योगामध्ये BS-VI परिवर्तनामध्ये आघाडी घेतल्याचा होंडाला अभिमान वाटतो. eSP सारखे आधुनिक तंत्रज्ञान, एसीजी स्टार्टर मोटर व मायलेजमधये मोठी वाढ अशी या श्रेणीतील पहिलीवहिली वैशिष्ट्ये यांनी #एक्वाएटरिव्होल्युशन सुरू केली आहे. होंडाचे 6 वर्षे वॉरंटी पॅकेज – टू-व्हीलर उद्योगातील पहिलेवहिले (3 वर्षे स्टँडर्ड + 3 वर्षे पर्यायी वॉरंटी) आणि आमच्या BS-VI उत्पादनांवर 10,000 रुपयांपर्यंत फायदा देणारी आकर्षक रिटेल फायनान्स योजना यामुळे मूल्यामधये वाढ झाली आहे. होंडाची BS-VI मॉडेल आणखी सक्षम होत जाणार आहेत आणि फेब्रुवारी 2020 पासून 100% BS-VI उत्पादनाला सुरुवात करणार आहोत, त्यामुळे या बाबतीतील उत्साह आणखी वाढत जाणार आहे.”

होंडाची #एक्वाएटरिव्होल्युशन!

एन्हान्स्ड स्मार्ट पॉवर (eSP) तंत्रज्ञान असणारे होंडाचे पूर्णतः नवे BSVI इंजिन हा #एक्वाएटरिव्होल्युशनचा गाभा आहे. eSP मध्ये प्रोग्रॅम्ड फ्युएल इंजेक्शन (PGM-Fi)सह रिड्युस्ड फ्रिक्शनल लॉसेस, एसीजी स्टार्टर मोटर यांचा समावेश आहे. 1982 मध्ये फर्स्ट वर्ल्डने PGM-Fi तंत्रज्ञान सादर केल्यापासून, होंडाच्या PGM-Fi तंत्रज्ञानाने आशियायी प्रदेशातील 55 दशलक्षहून अधिक ग्राहकांचा विश्वास जिंकला आहे आणि आता भारतातील ग्राहकांना आनंद देत आहे. मायलेजमध्ये मोठी वाढ (अॅक्टिव्हा 6G मध्ये 10% पर्यंत ते SP 125 मध्ये 16% पर्यंत अधिक मायलेज) and या उद्योगातील पहिले 6 वर्षे वॉरंटी पॅकेज (3 वर्षे स्टँडर्ड + 3 वर्षे पर्यायी वॉरंटी) अशी या श्रेणीतील पहिलीवहिली वैशिष्ट्ये अधिक मूल्य देत आहेत.

पूर्णतः नवी अॅक्टिव्हा 125 BSVI

जवळजवळ 26 नव्या पेटंटच्या* मदतीने विकसित केलेले आणि eSP तंत्रज्ञानाचे पाठबळ असलेले होंडाच्या विश्वासार्ह 125cc PGM-Fi HET इंजिन 13% अधिक मायलेजचे आश्वासन देते. या श्रेणीतील 5 पहिलीवहिली वैशिष्ट्ये (इंजिन इनहिबिटरसह साइड स्टँड इंडिकेटर, डिजिटल अॅनालॉग मीटर, इंटिग्रेटेड ड्युएल फंक्शन स्विच व एक्स्टर्नल फ्युएल लिड, इडलिंग स्टॉप सिस्टीम, अधिक स्टोअरेजसाठी फ्रंट ग्लोव्ह बॉक्स) आणि या उद्योगातील पहिले 6 वर्षे वॉरंटी पॅकेज (3 वर्षे स्टँडर्ड + 3 वर्षे पर्यायी वॉरंटी) अधिक मूल्य देत आहेत.

 

SP125 BSVI – ‘कटाक्षाने आधुनिकसाठी’

होंडाच्या नव्या SP125 ला 19 नव्या पेटंटचे* पाठबळ आहे. eSP तंत्रज्ञानासह पूर्णतः नवे 125cc HET इंजिन 16% अधिक मायलेज देते आणि SP 125 मध्ये या श्रेणीतील 9 पहिलीवहिली वैशिष्ट्ये व तंत्रज्ञान (फुल डिजिटल मीटर, डिस्टन्स टू एम्प्टी, सरासरी इंधनक्षमता, एलईडी डीसी हेडलॅम्प, इंजिन स्टार्ट/स्विच स्विच, इंटिग्रेटेड हेडलॅम्प बीम/पासिंग स्विच, इको इंडिकेटर, गिअर पोझिशन इंडिकेटर), तसेच या उद्योगातील पहिले 6 वर्षे वॉरंटी पॅकेज (3 वर्षे स्टँडर्ड + 3 वर्षे पर्यायी वॉरंटी) यांचा समावेश आहे. 

अॅक्टिव्हा 6G – भारताने 2020 वर्षाचे स्वागत केले पॉवर ऑफ 6ने!

eSP तंत्रज्ञानाचे पाठबळ असणारे पूर्णतः नवे 110cc HET PGM-Fi इंजिन 10% अधिक मायलेज देते. अॅक्टिव्हा 6G जवळजवळ 26 पेटंट*मुळे आघाडीवर असून यामध्ये सायलेंट स्टार्टसाठी एसीजी मोटर व जगातील पहिली स्मार्ट टम्बल टेक्नालॉजी (eSTT) यांचा समावेश आहे. नव्याने समाविष्ट केलेली 8 वैशिष्ट्ये (नवे टेलिस्कोपिक सस्पेन्शन, नवा एकात्मिक ड्युएल फंक्शन स्विच, नवीन मॅलफंक्शन लाइट, नवीन इंजिन स्टार्ट स्टॉप स्विच, एक्स्टर्नल फ्युएल लिड, पासिंग स्विच, डीसी एलईडी हेडलॅम्प, 3-स्टेप अॅडजस्टेबल रिअर सस्पेन्शन), या श्रेणीतील सर्वोत्तम ग्राउंड क्लीअरन्स, या उद्योगातील पहिले 6 वर्षे वॉरंटी पॅकेज (3 वर्षे स्टँडर्ड + 3 वर्षे पर्यायी वॉरंटी) आणि वाढ करणाऱ्या वैशिष्ट्यांचा समावेश (वाढीव फ्लोअर स्पेस, मोठे 12 इंच फ्रंट व्हील, लाँगर व्हीलबेस) यामुळे ग्राहकांना अधिक मूल्य दिले जाते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रात ठोकला तळ!

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी भाजपचे सूक्ष्म नियोजन;...

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी नादुरुस्त रोहित्रे तातडीने बदला- अध्यक्ष लोकेश चंद्र यांचे आदेश

महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर मुंबई, दि. १३ ऑक्टोबर २०२६:...

पुणे–बंगळुरू महामार्ग दिवसभर ठप्प: राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन

पुणे- महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाका आणि कर्नाटकातील हत्तरकी...

अवैध गर्भलिंग निदान व बोगस डॉक्टरांविरुद्ध धडक मोहीम राबवा : डॉ. नीलम गोऱ्हे

सोलापूरमध्ये पीसीपीएनडीटी (PCPNDT) व एमटीपी (MTP) आढावा बैठक; दलालांची...