पुणे–: राज्याची अग्रणी आणि सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख राष्ट्रीयीकृत बँक, बँक ऑफ महाराष्ट्राने विविध विभागातील उद्योगांना दिलेल्या कर्जाच्या रकमेची खाती थकीत झाल्यामुळे अशा खात्यांच्या रु 635 कोटी रुपयांच्या मालमत्तेची विक्री करणार आहे. 6 नोव्हेंबर रोजी ही सूचना बँकेने जारी केली आहे. थकीत झालेली कर्जे बॉम्बे रेयॉन, अंसल प्रॉपर्टीज, कोपरगांव-अहमदनगर टोलवेज यासह आयएसएमटी आदींची आहेत.
मालमत्तांच्या या विक्रीमुळे बँक ऑफ महाराष्ट्रच्या मालमत्ता गुणवत्ता याबरोबर आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.