पुणे- पंडित भिमसेन जोशी यांचे १०० वे जन्मशताब्दी वर्ष असल्याने सोशल डिस्टनसींगचे नियम पाळून भारतरत्न पंडित भिमसेन जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्वरभास्कर पुरस्कार देण्यात यावा असे पत्र पुणे महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कडे लेखी पत्र देऊन केली आहे.
त्यांनी पत्रात असेल म्हंटले आहे की सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराला अनेक महान व दिग्गज व्यक्तिमत्वे लाभली आहेत. गेल्या ७० वर्षात त्यांच्या कार्याप्रती आदर करून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी या हेतून महनीय व्यक्तींच्या नावाने विविध क्षेत्रात योगदान देणा-यांचा सन्मान पुणे महानगरपालिका करत आहे. याच माध्यमातून भारतरत्न पंडित भिमसेन जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्वरभास्कर नावाने पुरस्कार चालू केला होता. दि.४ फेब्रुवारी २०२१ रोजी भारतरत्न पंडित भिमसेन जोशी यांची १०० वी जयंती आहे.
यंदाचे वर्ष हे पंडित भिमसेन जोशी यांचे १०० जन्मशताब्दी वर्ष असल्याने सोशल डिस्टनसींग नियम पाळून यावर्षी भारतरत्न पंडित भिमसेन जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्वरभास्कर पुरस्कार देणेची कार्यवाही करावी. आपण हा पुरस्कार न दिल्यास सदर पुरस्कार आम्हास देणे भाग पडणार आहे. पंडित भिमसेन जोशी यांचे १०० जन्मशताब्दी वर्ष असल्याने सोशल डिस्टनसींग नियम पाळून यावर्षी भारतरत्न पंडित भिमसेन जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्वरभास्कर पुरस्कार देणेबाबत निर्णय घेवून सदर पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी आबा बागूल यांनी महापौर मोहोळ यांचेकडे केलेली आहे.