आषाढी अमावस्येच्या सायंकाळी पुण्यात महिलांकडून सामूहिक दीपपूजन
पुणे :
आषाढी अमावस्या (गटारी अमावस्या) परंपरेप्रमाणे दीपअमावस्या म्हणून साजरी करण्यासाठी 2 ऑगस्ट रोजी ‘प्रबोधन माध्यम’ संस्थेने महिलांच्या सामूहिक दीपपूजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार, दिनांक 2 ऑगस्ट 2016 रोजी सायंकाळी 7 वाजता नवी पेठ विठ्ठल मंदिर, टिळक रोड, पुणे येथे दीप अमावस्या साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे हे सहावे वर्ष आहे. महिला व युवतींना एकत्र करून सामूहिक दीपपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेच्या संचालक गौरी बिडकर यांनी दिली. हा कार्यक्रम नवी पेठ, विठ्ठल मंदीर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे.
दीप अमावस्या ही परंपरा विसरून गटारी अमावस्या आणि त्यानिमित्त सामिष सेलिब्रेशन ही नवीनच प्रथा रूढ झाली असताना दीप अमावस्येची सायंकाळ ही दीपपूजनाची, प्रकाशाच्या पूजनाची आणि श्रावणाचे स्वागत करण्याची आहे. हे अधोरेखीत करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
परिसरातील महिलांनी दिवे घेऊन दीपपूजनासाठी नवी पेठ विठ्ठल मंदिरात जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे. व्यसनमुक्तीचे आणि दीपपूजनाचे संदेश देऊन श्रावणाचे स्वागत या कार्यक्रमाद्वारे केले जाणार आहे.
दिनांक: 2 ऑगस्ट 2016
वार : मंगळवार
वेळ: सायंकाळी 7 वाजता
स्थळ: नवी पेठ विठ्ठल मंदिर, टिळक रोड, पुणे