Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘ख्रिसमस संध्या’;बागुल उद्यानात बालचमूंची अलोट गर्दी

Date:

पुणे
नाताळचा आनंद साजरा करताना मनोरंजनाबरोबरच पर्यावरणासह लेक वाचवा … आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा यासह विविध सामाजिक विषयांवर सहकारनगरमधील कै वसंतराव बागुल उद्यानात आयोजित ख्रिसमस संध्या या कार्यक्रमातून जाणीवजागृती करण्यात आली. विशेष  म्हणजे या ख्रिसमस संध्याला पालकांसह बालचमूंची अलोट गर्दी उसळली होती.याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष विश्वजित कदम , पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, नगरसेवक व पदाधिकारी उपस्तिथ होते
  माजी उपमहापौर आणि ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांच्या पुढाकाराने पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे दरवर्षी ख्रिसमस संध्या या उपक्रमाचे आयोजन केले जाते.यंदा १८ वे वर्ष असलेल्या या ख्रिसमस संध्यामध्ये बालचमूंनी विविध खेळांचा आनंद लुटला तसेच विविध खाद्य पदार्थांचा आस्वादही घेतला. संगीत गाणी , डान्स अशा भरगच्च कार्यक्रमाला बालचमूंची पालकांसमवेत गर्दीही अलोट झाली होती. माजी उपमहापौर आबा बागुल , पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल , अमित बागुल आणि बागुल कुटुंबीय तसेच पदाधिकारी -कार्यकर्त्यांनी आलेल्या सर्व बालचमूंचे आणि त्यांच्या पालकांचे जल्लोषात स्वागत केले. गेल्या १८ वर्षांपासूनची  या उपक्रमाची परंपरा अखंडित सुरु असल्याबद्दल पालकांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया नोंदविल्या . यंदाच्या ख्रिसमस संध्यामध्ये खेळ , खाऊ, नाचगाणे याबरोबरच सामाजिक  विषयांवरही प्रबोधन करण्यात आले.  माजी उपमहापौर आबा बागुल यांनी बालचमूंना आई-वडील हीच खरी ईश्वर सेवा असल्याचे महत्व पटवून देताना एकत्र कुटुंबपद्धत पाल्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असते यावरही भाष्य केले. तसेच पर्यावरण , पाणी बचत , लेक वाचवा यासह अन्य विविध सामाजिक विषयांवर प्रबोधन या कार्यक्रमातुन  करण्यात आले, त्याला उपस्थितांनीही भरभरून दाद दिली. अमित बागुल यांनी आभार मानले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...