… अखेर पालिकेचे रखडलेले पुरस्कार सुरु होणार !

Date:

 माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या पाठपुराव्याला यश 
पुणे – सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील  महनीय, दिग्गज व्यक्तिमत्वांचा महापालिकेतर्फे पुरस्काराद्वारे सन्मान करण्याचा खंडित झालेला  मार्ग अखेर मोकळा झाला असून रखडलेल्या पुरस्कारांचे वितरणही आता लवकरच होणार आहे. पक्षनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याने माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
 शहराला  अनेक महनीय, दिग्गज व्यक्तिमत्वे लाभली आहेत . गेल्या ७० वर्षात त्यांच्या कार्याप्रती आदर आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी त्या- त्या महनीय व्यक्तींच्या नावाने विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचा सन्मान महापालिकेतर्फे करण्यात येतो,तोही तरतुदीनुसार  मात्र राज्यशासनाच्या एका परिपत्रकामुळे या परंपरेत खंड पडण्याची स्थिती ओढवली आणि आठ – नऊ महिने या पुरस्कारांचे वितरण थांबले.राज्यशासनाच्या परिपत्रकाचा आणि न्यायालयाचे  निर्देश पुढे करून पुरस्कारांचे वितरण रोखण्यात आल्याने माजी उपमहापौर आबा बागुल यांनी कायद्यातील तरतुदींकडे वारंवार लक्ष वेधून हे पुरस्कार सुरु करण्याची मागणी केली होती आणि तसा ठरावही दिला होता. पक्षनेत्यांच्या बैठकीत हे  रखडलेले  पुरस्कार पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता संत जगनाडे महाराज, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, स्वरभास्कर आदी पुरस्कारांच्या वितरणाचा मार्ग सुकर झाला आहे. गतवर्षी रखडलेले आणि यंदाचे १७ पुरस्काराचे वितरण आता होणार आहे.या निर्णयाबद्दल बोलताना माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सर्व पक्षनेत्यांसह सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींचेही आभार मानले आहे. आबा बागुल म्हणाले,  ज्या महनीय व्यक्तींचा सन्मान केला जातो ,त्यांच्याकडून कधीही पुरस्काराच्या  रकमेची मागणी होत नाही. आपणच ती देत असतो. मात्र  न्यायालयाच्या निर्देशानुसार  राज्यशासनाने सरसकट पुरस्कार कार्यक्रमावर घातलेली बंदी  होती . केवळ पुणे नाही तर अन्य महापालिकाही  त्यांच्या -त्यांच्या शहरातील महनीय व्यक्तींचा सन्मान करीत असते. त्यामुळे जे पुरस्कार सुरु केलेले आहेत,ते कदापि बंद करू नयेत.   महनीय व्यक्तींच्या नावाने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण आणि त्यासाठी येणारा खर्च पाहता कोणतीही उधळपट्टी  पुणे महानगरपालिकेकडून होत नसल्याचे राज्यशासनाला  निदर्शनास आणून द्या तसेच  कायद्यातील तरतुदीनुसार मानधन न देणे ही तरतुद निदर्शनास आणून देऊन   पुरस्कार पुन्हा सुरु करा , यासाठी सतत पाठपुरावा केला  ,त्याला सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी साथ दिली,त्यांच्या लढ्याला यश आले असे मी मानतो,असे आबा बागुल म्हणाले. 


SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

परभणीतील यशवाडीत हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला; 7 भाविकांचा मृत्यू

परभणी-परभणीच्या मानवत तालुक्यातील प्रसिद्ध यशवाडी देवस्थान येथे शनिवारच्या गर्दीत...

माणवत मर्डर्स’ – उलगडणार एक थरारक रहस्य!

२२ जूनपासून रात्री १०.१५ वाजता सोनी मराठीवर! कौटुंबिक भावना, नात्यांची...

पुण्यात 500 मुलांसोबत पार पडले स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकारातून योगसत्र

विद लव्ह एनजीओ आणि एपिफनी स्कूलसोबत 500 मुलांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन पुणे,: आरोग्य आणि समावेशकतेचा संदेश देत विद लव्ह एनजीओने एपिफनी स्कूलच्या सहकार्याने 19 जून रोजी वंचित समुदायातील 500 मुलांसाठी विशेष आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन केले. योग मॅट्स नसतानाही मुलांनी चादरी आणि टॉवेल्स अंथरून संपूर्ण उत्साहाने आणि मनापासून योग केला. यामुळे एक महत्त्वाचा संदेश मिळाला की योगासाठी साधनांपेक्षा इच्छाशक्ती, सहभाग आणि सकारात्मक मनोवृत्ती अधिक महत्त्वाची असते. या कार्यक्रमात मुलांनी उत्साहाने योगासने, प्राणायाम, ध्यान आणि बजाज प्लँकथॉनपासून प्रेरित #100SecondsPlankTogether या उपक्रमात सहभाग घेतला. "500 Children. One Breath. One Future." या संकल्पनेखाली आयोजित या उपक्रमाचा उद्देश प्रत्येक मुलाला आरोग्य, आत्मविश्वास आणि आशा मिळण्याचा समान हक्क आहे, हा संदेश देणे हा होता. विद लव्ह एनजीओच्या संस्थापक डिंपल सोमजी म्हणाल्या, "आजचा दिवस केवळ योगाचा नव्हता, तर तो आपलेपणाचा उत्सव होता. 500 मुलांना एकत्र योग करताना, हसताना आणि सहभागी होताना पाहणे म्हणजे प्रत्येक मुलाला त्याच्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक विकासासाठी संधी मिळायला हवी, याची पुन्हा एकदा जाणीव करून देणारा क्षण होता." एपिफनी स्कूलच्या मुख्याध्यापिका संगीता कदम म्हणाल्या, "असे कार्यक्रम केवळ तंदुरुस्तीपुरते मर्यादित नसून मुलांसाठी सुंदर आठवणी निर्माण करतात, चांगल्या सवयी रुजवतात आणि त्यांना विशेष व महत्त्वाचे असल्याची जाणीव करून देतात." या कार्यक्रमाने एपिफनी स्कूलमधील अनेक मुलांच्या शैक्षणिक गरजांकडेही लक्ष वेधले. ही मुलं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून येतात. अनेकांच्या कुटुंबांवर गरीबी, गुन्हेगारी, मद्यपान आणि कठीण जीवनस्थितीची छाया आहे. काही मुलांचे संगोपन एकल पालक करत असून ते रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आयोजकांनी व्यक्ती, कुटुंबे, संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्राला शालेय फी, गणवेश, वह्या, शालेय साहित्य आणि इतर आवश्यक गोष्टींसाठी पुढे येऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमाचा समारोप अल्पोपहार, पुस्तकं आणि क्रीडा साहित्य वाटप तसेच प्रत्येक मुलाला शिकण्याची, वाढण्याची आणि प्रगती करण्याची संधी मिळावी, या सामूहिक संकल्पाने झाला. विद लव्ह एनजीओ विषयी:  विद लव्ह एनजीओ ही पुणेस्थित स्वयंसेवी संस्था असून शिक्षण, आरोग्य, स्वयंसेवा आणि प्रेमळ कृतींच्या माध्यमातून मुलं आणि समुदायांसाठी अर्थपूर्ण संधी निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे.