Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

एचसीएमटीआर रस्त्यासाठी तीन महिन्यात निविदा प्रक्रिया वाहतूक कोंडी फुटणार ,आयुक्तांची ग्वाही; आबा बागुल यांचे आंदोलन स्थगित

Date:

पुणे ;
 शहरातील रस्त्यावरचा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी व भविष्यातील रहदारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार्‍या ‘हाय कॅपेसिटी मास्ट ट्रांझिस्ट रूट’चा आराखडा पूर्णत्वाला आला आहे.  या रस्त्यासाठी तीन महिन्यात निविदा प्रक्रिया राबवून येत्या तीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला जाईल,तसेच  एचसीएमटीआर रस्त्यामुळे पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न सुटून पुणेकरांना दिलासा नक्कीच मिळेल अशी ग्वाही पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. दरम्यान   माजी उपमहापौर आबा बागुल यांनी  आयुक्तांना साखळीने जखडण्याचे आंदोलन तूर्त स्थगित केले आहे. 
 
मागील ३२ वर्षांपासून प्रलंबित असलेला पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे व खडकी कॅंटोन्मेंट अंतर्गत रिंगरोडसाठी  (एचसीएमटीआर) गेल्या ११ वर्षांपासून पाठपुरावा करणारे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी या रस्त्याच्या कामाला  प्रशासनाकडून गती मिळत नसल्याने आयुक्तांच्या दालनात स्वतःला किंवा वेळप्रसंगी आयुक्तांनाच साखळीने जखडून ठेवण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आयुक्त कुणाल कुमार यांनी सर्व अधिकारी वर्गाची बैठक माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या समवेत घेतली. या बैठकीला नगर अभियंता प्रशांत वाघमारे , राऊत , पर्यावरण क्षेत्रातील अनघा पुरोहित आणि एचसीएमटीआर रस्त्याचे सल्लागार असलेल्या स्तूप कन्सल्टन्टकडून राजशेखर हे उपस्थित होते. यावेळी  सन २०४० पर्यंत वाहतुकीची स्थिती लक्षात घेऊन या  एचसीएमटीआर रस्त्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. एकूण ८ हजार ३६८कोटी ७२ लाख रुपये खर्चाचा हा नियोजित मार्ग ३७ किलोमीटर २५ मीटर लांबीचा असून त्याची रुंदी २४ मीटरची असणार आहे. या मार्गावर ६ मार्गिका (लेन्स) असणार आहेत. त्यापैकी २ बीआरटीसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.इलेव्हेटेड असणाऱ्या या  मार्गावर बीआरटीसाठी ३० स्थानके असणार असून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या आणि यांत्रिक जिने (एलेव्हेटर्स) यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या रस्त्याच्या प्राथमिक कामांपासून प्रकल्पाच्या पूर्णत्वापर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्यात केंद्रसरकारकडून या रस्त्याच्या उभारणीसाठी अनुदान कसे घेता येईल तसेच बीओटी, पीपीपी मॉडेल यावरही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. जाहिरातींच्या माध्यमातूनही या रस्त्यासाठी निधी उपलब्ध होऊ शकतो अशा सूचनाही यावेळी करण्यात आली. 
 
निधीसाठी केंद्राकडे डीपीआर सादर करणार 
याप्रसंगी आयुक्त कुणाल कुमार म्हणाले कि, गत काही वर्षात शहरातील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. तसेच वाहतुक नियंत्रणाबाहेर गेली आहे.त्यासाठी  रिंगरोड हा शाश्‍वत पर्याय ठरला आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे व खडकी कॅंटोन्मेंट अंतर्गत रिंगरोडचा (एचसीएमटीआर) आराखडा स्तूप कन्सल्टन्टस  या सल्लागार संस्थेने तयार केला  आहे.  विशेषत: राष्ट्रीय महामार्गांना हा रस्ता जोडला जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग एकमेकांना जोडण्याचे धोरण जाहीर केले आहे त्यामुळे या रस्त्याच्या आखणीकरीता आवश्यक असणार्‍या अनुदानासाठी  केंद्र शासनाकडून निधी मिळावा यासाठी  डीपीआर लवकरच सादर केला जाणार आहे. पुणेकरांना जटील वाहतुकीच्या समस्येतून दिलासा देण्यासाठी या रस्त्यासाठी  निविदा प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण केली जाईल आणि तीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. असे त्यांनी स्पष्ट करून माजी उपमहापौर आबा बागुल  यांना आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली.  
 
 
नागरिकांचा जीवही  महत्वाचा ;आबा बागुल 
गेली ११ वर्षे या   एचसीएमटीआर रस्त्यासाठी पाठपुरावा करीत आहे.  आता अंतिम टप्प्यात हा प्रकल्प आलेला असताना त्याला गती मिळत नव्हती. पुणेकरांचे जीवही महत्वाचे आहेत. दिवसेंदिवस वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे. अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पुणेकरांच्या हितासाठी आयुक्तांना  साखळीने जखडून ठेवण्याच्या  आंदोलनाचा इशारा दयावा लागला होता,असे यावेळी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी स्पष्ट केले.    दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला हा  एचसीएमटीआर रोड मार्गी लागल्यानंतर पुणेकरांना शहरांतर्गत भेडसावणारा वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील वाहनांच्या गर्दीचा प्रश्न सुटण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होईल, असा विश्वासही आबा बागुल यांनी व्यक्त केला.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...