पुणे :
भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आय.एम.ई.डी.) चा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
‘नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क’(एन.आय.आर.एफ) मध्ये पुण्यात प्रथम, राज्यात 4 थ्या तर देशात 40 व्या क्रमांकाच्या महाविद्यालयाचे मानांकन मिळाल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला. डॉ. सचिन वेर्णेकर (भारती विद्यापीठ विश्व विद्यालय व्यवस्थापन शास्त्रशाखेचे अधिष्ठाता आणि ‘आय एम ई डी’चे संचालक) यांनी हा सत्कार स्वीकारला.
यावेळी भारती विद्यापीठ विश्व विद्यालयाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम उपस्थित होते.