पुणे : थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांना ११ मे १८८८ रोजी ” महात्मा” हि पदवी जनतेच्या वतीने देण्यात आली.त्यांच्या कार्याला व पुरोगामी विचारांना विनम्र अभिवादन करुन ,११ मे हा महात्मा दिन संत सावता माळी युवक संघाच्या जुन्नर तालुक्याच्या वतीने महात्मा फुले वाडा येथे विविध समाजपयोगी उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला.
“महात्मा दिन” ज्योतिबा फुले यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या गंजपेठ,पुणे येथील महात्मा फुले वाड्यातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन साजरा करण्यात आला.याप्रसंगी पुणे उपमहापौर नवनाथ कांबळे,माजी आमदार कमल ढोलेपाटील , संघाचे जुन्नर तालुकाध्यक्ष हभप.विशाल महाराज गडगे,तालुका महिलाध्यक्षा अनुराधाताई गडगे, कार्याध्यक्षा डाॅ.पुष्पलताताई शिंदे, उपाध्यक्षा अर्चनाताई विधाटे, उदापुर सरपंच प्रमिलाताई शिंदे, संजयशेठ शिंदे,अमोल भुजबळ,अर्चनाताई विधाटे,रेश्मा गडगे ,ज्योतीताई संते,ज्योतीताई रासकर,अमृता गडगे ,सोनाली शिंदे,सिंधूताई भुजबळ, याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी संघाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिलेल्या साहित्याचे वाटप करुन जनसामान्यांपर्यंत महात्मा फुलेंचे विचार पोहचवण्याचा प्रयत्न करुन महात्मा दिन साजरा करण्यात आला.किल्ले शिवनेरी (जुन्नर) तालुका संघाच्या वतीने तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात महात्मा दिन प्रशासकिय स्तरावर साजरा करण्यात यावा.फुले दांपत्यास मरणोत्तर भारतरत्न मिळावा.फुले दांपत्याचा शैक्षणिक अभ्यासक्रमात इयत्ता पहिलीपासून उच्च शिक्षणापर्यंत दरवर्षी एक तरी धडा असावा या मागण्या करण्यात आल्या.
यावेळी सुत्रसंचालन विशाल महाराज गडगे व आभार डाॅ.पुष्पलताताई शिंदे यांनी मानले.
संत सावता माळी युवक संघाच्या वतीने पुण्यात महात्मा दिन साजरा
Date: