पाणीपुरवठाप्रमुखांच्या हलगर्जीपणामुळे पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळला – विशाल धनवडे

Date:

पुणे -महापालिकेच्या पाणीपुरवठा प्रमुखांच्या हलगर्जीपणा आणि दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीमुळे शहरातील मध्यवर्ती भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीचा स्लॅबचा काही भाग कोसळल्याचा आरोप आज शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी केला आहे.

ते म्हणाले,’शहरातील मध्य वस्ती मध्ये पेठांना पाणी पुरवठा करणारी पर्वती दर्शन येथील पाण्याच्या टाकीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला त्यामुळे आज शिवसेनेच्या वतीने जागेवर पाहणी करून पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांना 8 दिवसाच्या आत स्ट्रकचरल ऑडिट करून ही पाण्याची टाकी दुरुस्त करावी का नवीन उभारण्यात यावी हा रिपोर्ट आयुक्तांना सादर करून जनतेस माहिती करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली . सदर टाकीची परिस्थिती ही खूपच धोकादायक झाली आहे याबाबत शिवसेना मागील 1 वर्षा पासून पत्र व्यवहार करीत असून सुद्धा प्रशासनाने जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले आहे असा शिवसेनेचा आरोप आहे .नगरसेवक विशाल धनवडे तसेच ,उमेश गालींदे उपशहर प्रमुख , विभाग प्रमुख चंदन साळुंके ,सुरज लोखंडे,रुपेश पवार ,स्वाती ताई कथलकर ,संदीप गायकवाड ,रवी निंबाळकर ,अमोल घुमे ,भाऊ शिंदे ,योगेश खेंगरे ,हनुमंत दगडे ,शुभम दुगाने ,विजय शेळके ,निलेश धनगर ,सागर भोसले ,योगेश येणपुरे ,हर्षद ठाकर ,रेहान खान ,आकाश शेरे ,आशिष शिंदे ,प्रतीक कडेकर ,विलास कथलकर आदी यावेळी उपस्थित होते

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसदीय कारकिर्दीच्या शताब्दीनिमित्त पुणे महापालिका राबवणार विशेष उपक्रम

व्याख्यानमाला, परिसंवाद, प्रदर्शनांसह वर्षभर विविध कार्यक्रम; एक कोटी रुपयांच्या...

महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यभरात विविध उपक्रम

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची माहिती​​मुंबई दि.०६ :- सत्यशोधक...

पुण्यात २०१७ पासून किती झाडे तोडली आणि किती जगली? संपूर्ण हिशेब द्या! — मनसेचे साईनाथ बाबर

वृक्षतोड, पुनर्रोपण आणि भरपाई वृक्षलागवडीचे स्वतंत्र लेखापरीक्षण करा; कंत्राटदारांवरील...