महाराष्ट्र आपदा निधीमध्ये एक महिन्याचे वेतन देतील मुंबईचे भाजपा नगरसेवक आणि आमदार

Date:

मुंबई. भारतीय जनता पार्टीचे मुंबईतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी महाराष्ट्र आपदा निधीमध्ये आपले एक महिन्याचे वेतन देतील. मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढ़ा ह्यांनी शुक्रवारी ही घोषणा केली आहे. त्यांनी म्हंटले की, कोरोनाशी लढण्यासाठी सर्व नगरसेवक आणि आमदारांच्या सहाय्यासह मोठ्या संख्येमध्ये भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते लॉक डाउनमधील आवश्यक लोकांची सेवाही करत आहेत.

मुंबई भाजपा अध्यक्ष लोढ़ा ह्यांनी एका पत्रकामध्ये माहिती दिली आहे की, जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या महामारीच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी पक्षातील सर्व नगरसेवक आणि विधायक ह्यांना आपले एक महिन्याचे वेतन महाराष्ट्र आपदा निधीमध्ये दान करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांनी म्हंटले की, त्याशिवाय सर्व पदाधिकारी व कार्यकर्तेसुद्धा आपल्या पातळीवर सहकार्य करत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा ह्यांच्या आवाहनानंतर लॉक डाउनमध्ये मुंबईमध्ये जेवणाची अडचण असलेल्या गरजू लोकांना भोजन उपलब्ध करण्यासाठीसुद्धा भाजपा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मदत पोहचवत आहेत. स्वत: मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार लोढ़ा मुंबई व ठाण्यामध्ये 20 हजारांपेक्षा जास्त लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करत आहेत. त्यांनी म्हंटले की, मुंबईमध्ये पक्षाचे कार्यकर्ते विविध ठिकाणी लोकांसाथी जेवणाची सोय करत आहेत. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्व देशाला एकत्र घेण्यासंदर्भात पंतप्रधानांचे कौतुक करताना म्हंटले आहे की, जनतेला सोबत घेऊन जनतेच्या सुरक्षिततेसाठी जननेत्याद्वारे हे अतिशय महान कार्य केले जात आहे व त्यापासून सर्व जग धडा घेऊ शकेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अमित शहा साहेब, आलाच आहात पुण्यात तर.. शहरातील टेकड्यांची अवस्था आणि वाहतुकीची समस्याही प्रत्यक्ष पाहून जा!

पुण्याच्या वाढत्या प्रदूषणामागची कारणेही जाणून घ्या; वृक्षवल्ली आम्हा सोयरी...

परदेशात भारताची बदनामी करून सत्ता मिळणार नाही; राहुल गांधींना अमित शहांचा पुण्यातून टोला!

‘परदेश दौरे बंद करा, देशातील गावागावांत फिरा’; काँग्रेस आणखी...

पुण्यातून अमित शहांच्या हस्ते एनएचईसी प्रकल्पाचे भूमिपूजन, ‘भारत टॅक्सी’चा शुभारंभ!

तळेगावातील ११० एकरवरील बंद पडलेल्या औद्योगिक प्रकल्पाचे पुनरुज्जीवन; डिसेंबर...

धनकवडीच्या शंकर महाराज मठात डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते दैनंदिनीचे प्रकाशन

मठाच्या अन्नदान उपक्रमाचे कौतुक, गरजू विद्यार्थ्यांना शासनाने एक वेळचे...