- 1 लाख 25 हजार रुग्ण बरे झाले
वॉशिंग्टन- जगभरात कोरोनाने 195 देशांना आपल्या विळख्यात घेतले आहे. आतापर्यंत 5 लाख 40 हजारांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत तर 24 हजार 294 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 1 लाख 25 हजार रुग्ण ठीक झाले आहेत.
आता या कोरोनाग्रस्तांच्या यादीत आता ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचेही नाव आले आहे. त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती आज समोर आली आहे. जॉनसन यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, “मागील 24 तासापासून माझ्यात कोरोनाची लक्षणे आढळून आली होती, आज चाचणी केल्यावर याची पुष्टी झाली आहे. मी स्वतःला आयसोलेट केले आहे. पण, व्हिडिओ कॉन्फरंसींगद्वारे काम करतच राहील. सोबत मिळून आपण या संकटाशीसामना करू.”
अमेरिकेत दररोज वाढत आहे संक्रमण
अमेरिकेत शुक्रवार संध्याकाळपर्यंत 85 हजार 612 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. तसेच, 1 हजार 301 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये 41 आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. 5000 पेक्षा जास्त डॉक्टर, नर्स, तेक्नीशियन आणि अँबुलेंस कर्मचारी कोरोनाने संक्रमित झाले आहेत. इथे आतापर्यंत 80 हजार 589 कोरोनाग्रस्त आढळले आहेत तर 8 हजार 215 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या एका कंपनीने स्पेनला खराब क्वॉलिटीची 9 हजार टेस्ट किट पाठवली. आता शी जिनपिंग सरकार प्रकरणाची चौकशी करत आहे.
भारतात आतापर्यंत 724 प्रकरणे, मृतांचा आकडा 20 वर
देशात कोरोना व्हायरसच्या बळींची संख्या 20 वर पोहोचली आहे. आज (शुक्रवार 27 मार्च) कर्नाटकच्या तुमकुर येथे एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. सदरील व्यक्ती 11 मार्च रोजी दिल्लीहून पतरला होता. तुमकुरच्या उपायुक्तांनी सांगितले की, त्या व्यक्तीसोबत प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचा शोध घेण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयानुसार देशात कोरोना संसर्गाचे आतापर्यंत 724 प्रकरणे समोर आली आहेत. यातील 66 लोक ठीक झाले आहेत. तर 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी एकाच दिवसात 6 लोकांना मृत्यू झाला होता.