आयुक्त नवल किशोर राम यांचे मुख्यमंत्र्यांकडून मनापासून कौतुक; ‘भाऊ फ्लेक्स काढा’ आणि अतिक्रमणविरोधी मोहिमेला खंबीर पाठबळ!

Date:

माझ्याही नावाचे बेकायदा होर्डिंग लागले तर पुरस्कारांच्या यादीत नाव जाहीर करा; नेते-कार्यकर्त्यांनी जनतेत दिसावे, होर्डिंग्जवर नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या नेतृत्वाखाली शहरात सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी आणि अनधिकृत जाहिरात फलकांविरोधातील मोहिमेची दखल आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. महापालिकेच्या अभिनव ‘भाऊ फ्लेक्स काढा’ या मोहिमेसह अतिक्रमणविरोधी कारवाईचे मुख्यमंत्र्यांनी मनापासून कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, उद्या माझ्या नावाचेही बेकायदा होर्डिंग लागले, तर पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करा, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाच्या कारवाईला पाठबळ दिले आहे.

शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून पुणे महापालिकेच्या कार्यवाहीचे अभिनंदन केले. शहरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागा नागरिकांसाठी मोकळ्या असल्या पाहिजेत, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

नियम केवळ शासकीय दस्तावेजात छापण्यासाठी नसतात!

पुण्यात सध्या अतिक्रमणांविरोधात आणि विशेषतः अनधिकृत होर्डिंग्जविरोधात सुरू असलेल्या कारवाईबद्दल पुणे महापालिका प्रशासनाचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो. शहरातील पायाभूत सुविधांचा नागरिकांना योग्य वापर करता आला पाहिजे. वाहनांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी मोकळ्या जागा उपलब्ध असल्या पाहिजेत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

नियम हे केवळ शासन निर्णय किंवा शासकीय दस्तावेजांमध्ये प्रकाशित करण्यासाठी नसतात, तर ते प्रत्यक्षात पाळण्यासाठी असतात. सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुखकर करणे, हाच त्यामागील खरा उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

माझ्या नावाचे होर्डिंग लागले तरी माझे नाव जाहीर करा!

बेकायदेशीर होर्डिंग्ज ही केवळ पुण्याची समस्या नसून सर्वच शहरांमध्ये ती गंभीर बनली आहे. त्याविरोधात सातत्याने आणि नियमितपणे कारवाई होणे आवश्यक आहे. पुणे महापालिकेने स्वीकारलेल्या अभिनव आणि अस्सल पुणेरी संकल्पनेचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

उद्या माझ्या स्वतःच्या नावाचे जरी बेकायदा होर्डिंग लागले, तरी प्रशासनाने कोणताही मुलाहिजा न ठेवता तुमच्या त्या पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करावे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनाही स्पष्ट संदेश दिला आहे.

नेते आणि कार्यकर्त्यांनी जनतेत दिसावे, होर्डिंग्जवर नाही!

राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी अनधिकृत जाहिरात फलकांच्या माध्यमातून शहराचे विद्रुपीकरण करण्याऐवजी जनतेमध्ये राहून काम करावे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली.

नेते असोत की कार्यकर्ते, ते कायम जनतेतच दिसले पाहिजेत, बेकायदा होर्डिंग्जवर नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

पुण्याच्या मोहिमेची नागपुरातही दखल; हिवाळी अधिवेशनापूर्वी कडक निर्देश

आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर होर्डिंग्ज लावली जाण्याची शक्यता लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी नागपूर प्रशासनालाही सतर्क केले आहे.

प्रशासनाने आत्तापासूनच जनजागृती करावी. अनधिकृत होर्डिंग्जमुळे नागपूर शहराचे विद्रुपीकरण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

नेमकी काय आहे ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहीम?

पुणे महापालिकेने २४ नोव्हेंबर २०२६ पासून शहरातील अनधिकृत फ्लेक्सबाजीला आळा घालण्यासाठी ‘भाऊ फ्लेक्स काढा’ ही अभिनव डिजिटल मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत पुणेकरांना थेट सहभागी करून घेण्यात आले आहे.

शहरातील रस्ते, चौक, पदपथ आणि झाडांवर लावलेल्या अनधिकृत फ्लेक्सचे छायाचित्र नागरिकांना महापालिकेच्या https://bhauflexkadha.pmc.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करता येते.

सर्वाधिक अनधिकृत फ्लेक्स आढळणाऱ्या व्यक्तींची नावे आणि छायाचित्रे ‘विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी’ म्हणून जाहीर करण्याची अनोखी संकल्पना महापालिकेने राबविली आहे.

महापौरांसह सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही घरचा आहेर

या मोहिमेला पुणेकरांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक राजकीय नेत्यांच्या अनधिकृत फ्लेक्सबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, महापौर मंजुषा नागपुरे यांच्याशी संबंधित फ्लेक्सचीही महापालिकेच्या मोहिमेत दखल घेण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी स्वतः महापालिकेच्या कारवाईचे समर्थन केल्याने प्रशासनाच्या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

आयुक्त नवल किशोर राम यांच्या मोहिमेला मुख्यमंत्र्यांचे पाठबळ; आता सातत्य राखण्याचे आव्हान

पुणे शहरातील अतिक्रमणे हटविणे, रस्ते आणि पदपथ मोकळे करणे तसेच अनधिकृत फ्लेक्सबाजीला आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मोहिमेला आता मुख्यमंत्र्यांचे पाठबळ मिळाले आहे.

मात्र, या कारवाईचे खरे यश तिच्या सातत्यावर अवलंबून राहणार आहे. राजकीय दबावाला बळी न पडता, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता महापालिका प्रशासन ही मोहीम कायमस्वरूपी राबविणार का? हटविलेली अतिक्रमणे पुन्हा उभी राहणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाणार का? अनधिकृत फ्लेक्समुक्त पुण्याचे चित्र प्रत्यक्षात साकार होणार का?

मुख्यमंत्र्यांच्या समर्थनानंतर आता या प्रश्नांची उत्तरे महापालिकेच्या पुढील कार्यवाहीतून मिळावीत, अशी पुणेकरांची अपेक्षा आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हुतात्मा चौकात लावणीचा मराठमोळा साज; ‘फुलवरा’च्या नायिकांची हुतात्म्यांना मानवंदना!

वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या लावणीसाजाने वेधले लक्ष;...

संभाजीनगरचा रस्ता खरेच मोकळा होणार की कारवाई ठरणार तात्पुरती? महापालिकेच्या भूमिकेकडे पुणेकरांचे लक्ष!

कात्रज, धनकवडी, सहकारनगर आणि बिबवेवाडी परिसरातील नागरिकांमध्ये अतिक्रमण कारवाईबाबत...

‘देश संविधानाने चालेल, मनमानीने नाही!’ नागपुरात CJP ची संविधान बचाव रॅली; अभिजीत दिपके यांचा केंद्र सरकारवर घणाघात

संविधान दिनी चार हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग असल्याचा आयोजकांचा...