प्रकाशपर्वानिमित्त पुण्यातील गुरु नानक दरबार गुरुद्वाराला भेट; शीख बांधवांशी साधला संवाद
पुणे : शीख धर्माचे संस्थापक आणि प्रथम गुरू श्री गुरु नानक देवजी यांनी संपूर्ण मानवजातीला दिलेला शांती, प्रेम, समता, बंधुता आणि निःस्वार्थ सेवेचा संदेश आजही संपूर्ण विश्वासाठी दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.

श्री गुरु नानक देवजी यांच्या प्रकाशपर्वानिमित्त पुण्यातील कॅम्प परिसरातील गुरु नानक दरबार गुरुद्वाराला मोहोळ यांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी गुरुद्वारा व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आलेला सत्कार त्यांनी स्वीकारला. तसेच उपस्थित शीख बांधवांशी संवाद साधला.
गुरुनानक देवजींच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करत मोहोळ यांनी त्यांच्या शांती, बंधुभाव आणि मानवसेवेच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.
‘सतनाम श्री वाहेगुरू’ असे म्हणत मोहोळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या भेटीची माहिती आणि छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.
याप्रसंगी आमदार सुनील कांबळे, गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि शीख बांधव उपस्थित होते.

