गुरुनानक देवजींचे विचार संपूर्ण मानवजातीला दिशा देणारे – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Date:

समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश प्रत्येकाने आचरणात आणावा; पुण्यातील गुरु नानक दरबार गुरुद्वाराला भेट

पुणे : शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक देवजी यांचे विचार संपूर्ण मानवजातीला दिशा देणारे असून, त्यांनी दिलेला समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश प्रत्येकाने आपल्या जीवनात आचरणात आणावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.

गुरुनानक जयंतीनिमित्त पुण्यातील कॅम्प परिसरातील गुरु नानक दरबार गुरुद्वाराला त्यांनी आज (२४ नोव्हेंबर) भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शीख बांधवांना गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

गुरुनानक देवजींचा ‘एक ओंकार’ हा विचार संपूर्ण मानवजात एक असल्याचा संदेश देतो. ईश्वराचे स्मरण करणे, प्रामाणिकपणे कष्ट करणे आणि आपल्या उत्पन्नातील वाटा इतरांसोबत वाटून घेणे, या तीन सूत्रांमध्ये आदर्श जीवनाचे संपूर्ण तत्त्वज्ञान सामावलेले असल्याचे पवार यांनी सांगितले.

लंगर परंपरा हे सामाजिक समतेचे जिवंत उदाहरण

गुरुद्वारातील लंगर परंपरा हे गुरुनानक देवजींच्या विचारांचे जिवंत उदाहरण आहे. जात, धर्म, श्रीमंत-गरीब असा कोणताही भेद न करता सर्वजण एकाच पंगतीत भोजन करतात. माणसामाणसांमधील अंतर कमी करून समाजाला एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या परंपरेतून होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्रात मानवतेचे विचार अधिक व्यापकपणे रुजवूया

महाराष्ट्र ही संत आणि समाजसुधारकांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मांचा आदर करून सर्वांना सोबत घेण्याचा आदर्श घालून दिला. याच महाराष्ट्रात गुरुनानक देवजींचे समता, बंधुभाव आणि मानवतेचे विचार अधिक व्यापकपणे रुजविणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे पवार म्हणाल्या.

पुण्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील गुरुद्वारा संस्थेच्या योगदानाचाही त्यांनी गौरव केला. महाराष्ट्र अधिक समृद्ध, सुसंस्कृत आणि एकजूट बनविण्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शीख बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रस्त्यावर राडारोडा टाकणे पडले महागात; बुधवार पेठेत बांधकाम व्यावसायिकाला २५ हजारांचा दंड!

‘आरासुरी कन्स्ट्रक्शन’वर महापालिकेच्या आरोग्य विभागाची कारवाई; सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता...

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय२० मराठी चित्रपटांचा महोत्सव६ ते ९ डिसेंबर काळात रसिकांना पर्वणी

पुणे-महाराष्ट्र शासनाचा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा ‘रौप्य...

हर्षदा फरांदे यांची भाजप ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी...