प्रशासकीय दबाव आणि विविध अडचणींवर मात करून पुण्यात प्रथम टीपू सुलतान यांची जयंती साजरी – ॲड. तौसिफ शेख

Date:

पुणे | २० नोव्हेंबर २०२६

विविध दबाव, प्रशासकीय अडथळे आणि धमक्यांचा सामना करूनही पुण्यात प्रथम स्वातंत्र्ययोद्धे टीपू सुलतान यांची जयंती मोठ्या सन्मानाने, उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. यावेळी टीपू सुलतान यांच्या प्रतिमेचे अनावरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम सुपर मॉल, साळुंके विहार रोड, वानवडी, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे आयोजन ॲड. सूरज जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाला विविध धर्म, जाती आणि समाजातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच हितचिंतक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. सर्वधर्मीय आणि सर्वसमाजातील नागरिकांच्या उपस्थितीने सामाजिक एकता, बंधुभाव आणि धार्मिक सलोख्याचा संदेश दिला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांना मोठ्या प्रशासकीय दबावाला आणि अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. कार्यक्रमाच्या आदल्या रात्री बारा वाजल्यापासूनच पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून बॅनरच्या संदर्भात दबाव आणण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Senior PI), ACP, DCP, स्पेशल ब्रँच आणि LIB विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सातत्याने चौकशी आणि संपर्क करण्यात येत होता.

आयोजकांच्या म्हणण्यानुसार, कार्यक्रमस्थळी पोलीस प्रशासनाची सतत उपस्थिती होती. याचदरम्यान कार्यक्रमाचे आयोजक एजाज शेख आणि मंडपाचे काम करणाऱ्या व्यक्तीला पोलीस वाहनातून वानवडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्यांचे जबाब नोंदवून त्यांना नोटीस देण्यात आली. त्यानंतर ॲड. सूरज जाधव यांनाही पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आणि नोटीस देण्यात आली.

कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या नागरिकांची नावे आणि पत्तेही नोंदवण्यात आले. उपस्थित नागरिकांना भयभीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच फोटो आणि व्हिडिओ काढण्यासही मज्जाव करण्यात आल्याचा आरोप आयोजकांनी केला. आयोजकांना FIR दाखल करण्याची धमकीही देण्यात आली. मात्र, या सर्व दबावाला न जुमानता आयोजकांनी कार्यक्रम रद्द करण्यास नकार दिला. कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्याची तयारी असूनही आपल्या संविधानिक अधिकारांपासून मागे हटणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

काही कट्टरपंथी विचारसरणीच्या व्यक्तींनी फोनद्वारे धमकावण्याचा आणि दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचेही आयोजकांनी सांगितले. मात्र, सर्व सहकारी आणि समर्थक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि नियोजित कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

यावेळी ॲड. तौसिफ शेख म्हणाले की, “भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला आपले विचार व्यक्त करण्याचा, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे स्मरण करण्याचा आणि शांततापूर्ण पद्धतीने कार्यक्रम आयोजित करण्याचा अधिकार देते. मग एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची जयंती साजरी करण्यासाठी एवढा संघर्ष का करावा लागतो? हा संघर्ष कोणत्याही व्यक्ती किंवा समाजाच्या विरोधात नसून संविधानिक अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि इतिहासाच्या सन्मानासाठी आहे.”

कार्यक्रमाला उपस्थित राहून आयोजकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेल्या सर्व नागरिकांचे, सहकाऱ्यांचे आणि हितचिंतकांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. प्रतिकूल परिस्थितीतही नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता कार्यक्रमाला उपस्थिती लावली, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भीतीपोटी कार्यक्रमाला येऊ न शकलेल्या सहकाऱ्यांचाही मिश्किल शब्दांत उल्लेख करत, “काही हरकत नाही, पुढच्या वेळी निदान फोनवरून तरी हुरूप वाढवा!” असा टोला लगावला.

शेवटी ॲड. तौसिफ शेख यांनी स्पष्ट केले की, हा संघर्ष केवळ एका जयंती सोहळ्यापुरता मर्यादित नसून संविधानिक अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी सुरू असलेला संघर्ष आहे.

– ॲड. तौसिफ शेख

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दंतोपचाराचा सरकारी आरोग्य योजनांमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्नशील

चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन; इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्रीतर्फे...

पुणे जिल्हा परिषदेचे २५ गुणवंत विद्यार्थी अमेरिकेतील नासा, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि गुगल परिसराला देणार भेट

२० हजार विद्यार्थ्यांमधून आयुका संस्थेच्या निवड प्रक्रियेद्वारे निवड; २०...

मॉडेल स्कूल चांदे आणि ग्राम सचिवालयाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण !

303 मॉडेल स्कूलची कामे पूर्णत्वाकडे; उर्वरित कामे डिसेंबरअखेर पूर्ण...