दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचे योगदान

Date:

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ३.६८ कोटी रुपयांची मदत!

मुंबई: दि. ०६ नोव्हेंबर २०२६: महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ३ कोटी ६८ लाख १७ हजार ८८७ रुपयांची भरीव मदत केली आहे. अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला आणि मा. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी शुक्रवारी (०६ नोव्हेंबर) मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची मुंबईस्थित वर्षा निवासस्थानी भेट घेऊन या मदतनिधीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला.

ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विक्रम कुमार, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. राधाकृष्णन बी., महावितरणचे संचाल‍क श्री. धनंजय औंढेकर (संचालन), श्री. योगेश गडकरी (वाणिज्य), श्री. अनुदीप दिघे (वित्त), श्री. राजेंद्र पवार (मानव संसाधन) यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या भीषण दुष्काळाचे सावट असून, बळीराजा आणि ग्रामीण जनता मोठ्या संकटात आहे. या संकटकाळात दुष्काळग्रस्तांना हक्काचा आधार देण्यासाठी महावितरणच्या ऊर्जेने भारलेल्या संवेदनशील कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने आपले योगदान दिले आहे. वर्ग एकच्या अधिकाऱ्यांपासून ते क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनीच या मदतकार्यात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला.

धनादेश स्वीकारताना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आणि व्यवस्थापनाचे विशेष आभार मानले. ‘दुष्काळाच्या या कठीण काळात महावितरणने दाखवलेली ही संवेदनशीलता कौतुकास्पद आहे. ही मदत दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना तत्काळ दिलासा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल,’ अशा भावना मा. मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केल्या. महावितरणने नेहमीच वीज पुरवठ्यासोबतच सामाजिक जबाबदारीचे भान राखले आहे. संकटाच्या काळात महावितरण राज्यासोबत ठामपणे उभी राहते, हे या मदतीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

पुरस्काराबद्दल कौतुक: केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (MNRE) आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (PFC) यांच्या मूल्यांकन अहवालानुसार ‘रिन्युएबल एनर्जी स्टेट असेसमेंट फ्रेमवर्क’ (RE-SAF) अंतर्गत भारतामध्ये हरित ऊर्जेच्या निर्मिती आणि विकासात महाराष्ट्र राज्याला देशातील राज्यांमध्ये द्वितीय क्रमांक मिळाला आहे. या पुरस्काराबद्दल मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला आणि अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्यासह महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे यावेळी अभिनंदन व कौतुक केले

mymarathi.net चे सर्व वाचक, दर्शक स्नेही ,फौलोअर्स, जाहिरातदार ज्यांच्या पाठींब्यावर १४ वर्षे मराठी न्यूज देण्यासाठी कोणत्याही बड्या भांडवलदारा शिवाय आम्ही स्वतंत्रपणे अविरत वाटचाल सुरु ठेवली आहे. अशा सर्वांना दीपावली निमित्त खूप खूप शुभेच्छा………







SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसदीय कारकिर्दीच्या शताब्दीनिमित्त पुणे महापालिका राबवणार विशेष उपक्रम

व्याख्यानमाला, परिसंवाद, प्रदर्शनांसह वर्षभर विविध कार्यक्रम; एक कोटी रुपयांच्या...

महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यभरात विविध उपक्रम

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची माहिती​​मुंबई दि.०६ :- सत्यशोधक...

पुण्यात २०१७ पासून किती झाडे तोडली आणि किती जगली? संपूर्ण हिशेब द्या! — मनसेचे साईनाथ बाबर

वृक्षतोड, पुनर्रोपण आणि भरपाई वृक्षलागवडीचे स्वतंत्र लेखापरीक्षण करा; कंत्राटदारांवरील...