लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

Date:

‘विकसित महाराष्ट्र २०३०’ आणि शाश्वत विकास ध्येयांच्या पूर्ततेसाठी अधिकाऱ्यांना आवाहन*

पुणे, दि. ५ : विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासनाने अधिकाधिक लोकाभिमुख दृष्टिकोन स्वीकारावा. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक व परिणामकारक करावे. त्याचबरोबर प्रत्यक्ष क्षेत्रभेटी, कामांची पाहणी आणि नागरिकांशी थेट संवाद यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावा, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले.

यशदा येथे राज्यातील पाच ते सहा वर्षांचा प्रशासकीय सेवेचा अनुभव असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांसाठी आयोजित ‘गव्हर्नन्स २०३०’ या एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते.

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी संपूर्ण दिवसभर कार्यशाळेत उपस्थित राहून अधिकाऱ्यांशी संवाद साधला. प्रशासनाच्या कामकाजाचा अंतिम लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असल्याचे नमूद करून त्यांनी अधिकाऱ्यांनी नियमित क्षेत्रीय दौरे करावेत, विकासकामांना प्रत्यक्ष भेटी देऊन कामांच्या गुणवत्तेची पाहणी करावी आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी नागरिकांच्या दृष्टीने किती परिणामकारक ठरत आहे, याचा आढावा घ्यावा, असे सांगितले. जिल्हा नियोजन अधिकारी यांना गावात जावे. तेथील स्थिती पहावी जेणे करून याची जिल्हा नियोजनात मदत होईल असेही यावेळी त्यांनी नमुद केले.

तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रातील अनुभव यांची सांगड घालून प्रशासन अधिक संवेदनशील, कार्यक्षम आणि लोककेंद्रित करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

कार्यशाळेच्या प्रारंभी विकसित महाराष्ट्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा कुलकर्णी यांनी विकसित महाराष्ट्राचे व्हिजन, त्यातील प्राधान्याची क्षेत्रे आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची भूमिका व जबाबदाऱ्या याबाबत मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी शाश्वत विकास ध्येयांच्या अनुषंगाने राज्याची देशपातळीवरील कामगिरी अधिक उंचावण्यासाठी जिल्हास्तरावर करावयाचे नियोजन, प्राधान्यक्रम आणि प्रभावी अंमलबजावणी याबाबत सविस्तर विवेचन केले. नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत राज्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देताना त्यांनी नीती आयोगाने निवडलेल्या २७ तालुक्यांव्यतिरिक्त राज्य शासनाने आणखी १५० तालुक्यांची निवड केली असून, अशा एकूण १७७ तालुक्यांमध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमातील विविध निर्देशक, त्यांचे महत्त्व, प्रगतीचे मोजमाप आणि नियमित आढावा घेण्याच्या पद्धतीबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यासाठी विकसित करण्यात येत असलेल्या स्वतंत्र पोर्टलची माहितीही यावेळी देण्यात आली.

ॲक्सिस माय इंडियाचे प्रदीप गुप्ता यांनी क्षेत्रीय स्तरावर वस्तुनिष्ठ माहिती संकलित करणे, नागरिकांच्या अनुभवांच्या आधारे योजनांचे मूल्यमापन करणे आणि प्रत्यक्ष परिणामांचा अभ्यास करण्याच्या पद्धतींबाबत सादरीकरण केले.

यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आभार मानले. सहायक प्राध्यापक सीमा जगताप यांनी सूत्रसंचालन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० हजार प्रवाशांनी केला प्रवास

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद; गर्दीच्या वेळेत दर पाच...

पुणे महापालिकेच्या बांधकामस्थळांवर सुरक्षा नियमांची सक्ती; त्रुटी आढळल्यास काम बंद करण्याचे आदेश!

दिवाळीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांचे परिपत्रक;...

कुंभमेळ्याच्या नावाखाली फडणवीस सरकारचा मोठा भ्रष्टाचार, ३६ हजार कोटींच्या निधीत ५० टक्क्यांची मलई: हर्षवर्धन सपकाळ

भाजपा-महायुती सरकारने भ्रष्टाचारासाठी पवित्र कुंभमेळाही सोडला नाही, देवेंद्र फडणवीसांकडून...