२५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्ण

Date:

मका, कडवळ बियाण्यांचा समावेश; उर्वरित बियाण्यांचे आठवडाभरात वितरण होणार

उर्वरित बियाणे आठवडाभरात मिळणार

पुणे, दि. ५ : संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी पुणे जिल्ह्यात २५ हजार एकर क्षेत्रावर चारा लागवडीचे नियोजन करण्यात आले असून, यासाठी मका आणि कडवळ या चारा पिकांच्या बियाण्यांचे वाटप युद्धपातळीवर सुरू आहे. महाबीज आणि राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून प्राप्त झालेल्या २२० टन बियाण्यांपैकी आतापर्यंत ८० टक्के बियाण्यांचे वाटप पूर्ण झाले आहे. उर्वरित बियाणे पुढील आठवडाभरात प्राप्त होणार असून त्याचेही पशुपालक शेतकऱ्यांना वितरण करण्यात येणार आहे.

बियाणे वाटपाला गती; पशुपालकांपर्यंत थेट पोहोच
चारा लागवडीसाठी मका आणि कडवळ या पिकांच्या बियाण्यांचा समावेश आहे. तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत नोंदणीकृत पशुपालक शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात येत आहे. उर्वरित बियाणे प्राप्त होताच त्याचेही तातडीने वितरण करण्याचे नियोजन आहे. अधिकाधिक क्षेत्रावर चारा उत्पादन घेऊन आगामी टंचाईच्या काळात पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर देण्यात येत आहे.

चारा साक्षरता अभियानातून शास्त्रीय मार्गदर्शन
चारा लागवडीसोबतच चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि संवर्धन करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या सहभागातून चारा साक्षरता प्रशिक्षण अभियानांतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. यामध्ये चाऱ्याचे नियोजन, उपलब्ध चाऱ्यापासून मुरघास निर्मिती आणि भविष्यातील टंचाईच्या काळासाठी चारा साठवणूक व संवर्धन याबाबत पशुपालकांना मार्गदर्शन केले जात आहे.

अझोला, युरिया प्रक्रियेची प्रात्यक्षिके
कार्यशाळांमध्ये पर्यायी चारा स्रोत म्हणून अझोला उत्पादनाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे. तसेच वाढलेल्या चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करून त्याची पौष्टिकता वाढविणे आणि सकस चारा तयार करण्याचे तंत्रही समजावून सांगितले जात आहे. स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पशुपालकांचे नियमित प्रबोधन करण्यात येत आहे. या उपाययोजनांमुळे पशुधनाची उत्पादकता टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे.

टंचाईपूर्व नियोजनावर प्रशासनाचा भर
शासनाच्या नवीन धोरणानुसार अधिकाधिक चारा उत्पादनावर लक्ष केंद्रित करून जिल्ह्यात उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजेश कुमार वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली बियाणे वितरण, चारा लागवड, चारा संवर्धन आणि पशुपालक प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे. संभाव्य टंचाईच्या काळात पशुधनाला पुरेसा व सकस चारा उपलब्ध व्हावा, यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य दिले जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सुतारदरा, तळजाई टेकडीफोड प्रकरणी गुन्हे दाखल करणार! शहर अभियंता पावसकर यांची स्थायी समितीत ग्वाही

सुतारदऱ्यात महापालिकेची पूर्वपरवानगी न घेताच खोदकाम झाल्याचा नोटिशीत उल्लेख;...

सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष भगवत प्रसाद मकवाना

थकीत वेतन, घरकुल, नियुक्त्या आणि आर्थिक योजनांच्या अंमलबजावणीबाबत अधिकाऱ्यांना...

पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्त

पुणे, दि. ५ : पुण्यातील शुक्रवार पेठ परिसरातील राहुल...

आंदेकर टोळीला हायकोर्टाचा दिलासा:लक्ष्मी आंदेकर यांना जामीन मंजूर, सरकारी वकिलांची 4 आठवड्यांची स्थगिती मागणी फेटाळली

पुणे -पुण्यातील बहुचर्चित आंदेकर टोळीशी संबंधित खटल्यात उच्च न्यायालयाने...