महाराष्ट्रात सहा केंद्रांद्वारे ५४ हजार विद्यार्थ्यांना भोजन; विक्रमगडमध्ये २५ हजार भोजन क्षमतेचे केंद्रीकृत स्वयंपाकगृह प्रस्तावित

Date:

पुणे, दि. ५ : अक्षय पात्र फाऊंडेशनच्या पुणे येथील केंद्रातून दररोज सुमारे १० हजार विद्यार्थ्यांना भोजन पुरविण्यात येते. महाराष्ट्रातील ठाणे, कल्याण, भिवंडी, पनवेल, नागपूर आणि पुणे या सहा केंद्रांद्वारे एकूण ५४ हजार विद्यार्थ्यांसाठी भोजन पुरविले जाते. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे दररोज २५ हजार भोजन तयार करण्याची क्षमता असलेले केंद्रीकृत स्वयंपाकगृह उभारण्याचा प्रस्ताव फाऊंडेशनने मांडला आहे.

पुण्यातील केंद्रातून होणारा भोजनपुरवठा हा संस्थेच्या महाराष्ट्रातील उपक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. संस्थेच्या आकडेवारीनुसार, ठाणे येथे १५ हजार ५००, कल्याण येथे ९ हजार ५००, भिवंडी येथे १६ हजार ५००, पनवेल येथे १० हजार आणि नागपूर येथे केवळ नाश्त्यासाठी १ हजार ५०० लाभार्थ्यांना सेवा दिली जाते. पुण्यातील १० हजार लाभार्थ्यांसह महाराष्ट्रातील एकूण लाभार्थी संख्या ५४ हजार आहे.

विक्रमगडमध्ये २५ हजार भोजन क्षमतेचे स्वयंपाकगृह
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांच्या पोषणविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी अक्षय पात्र फाऊंडेशनने अत्याधुनिक केंद्रीकृत स्वयंपाकगृह उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रकल्पासाठी रोटरी क्लब ऑफ मुंबईने सुमारे दीड एकर जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. स्वयंपाकगृहाचे बांधकाम आणि पायाभूत सुविधांची उभारणी फाऊंडेशनकडून देणगीदार व भागीदारांच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.
विक्रमगड तालुक्यातील UDISE २०२५-२६ च्या आकडेवारीनुसार, २७३ शाळांमध्ये एकूण २९ हजार १२४ विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या २३५ शाळांतील १५ हजार ९१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शासकीय, अनुदानित आणि अन्य पात्र शाळांमधील विद्यार्थ्यांना पौष्टिक भोजन उपलब्ध करून देणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

पहिल्या टप्प्यात तीन हजार विद्यार्थ्यांना लाभ
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे दोन ते तीन हजार विद्यार्थ्यांना भोजन देण्याचे प्रस्तावित आहे. आवश्यक शासकीय मंजुरी आणि कार्यान्वयनाची तयारी यानुसार पुढील टप्प्यांत लाभार्थ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. अंतिम टप्प्यात दररोज २५ हजार भोजन तयार करण्याची क्षमता गाठण्याचे नियोजन आहे.

शाळेतील उपस्थिती आणि अध्ययनक्षमता वाढविण्यावर भर
अक्षय पात्र फाऊंडेशन शासकीय व शासन अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन उपलब्ध करून देण्याचे काम सन २००० पासून करीत आहे. संस्थेच्या माहितीनुसार, देशभरातील १६ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमधील ७६ ठिकाणी, २५ हजारांहून अधिक शाळांमधील सुमारे २३.५ लाख विद्यार्थ्यांना भोजन पुरविले जाते.
पौष्टिक भोजनामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य, शाळेतील उपस्थिती, एकाग्रता आणि अध्ययनक्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते. तसेच विद्यार्थ्यांची शाळेतील गळती कमी करण्यास आणि पोषण सुरक्षा बळकट करण्यास हातभार लागू शकतो.

विक्रमगड येथील प्रस्तावित प्रकल्पासाठी जिल्हा परिषद, स्वयंअर्थसहाय्यित, खासगी अनुदानित आणि नियमानुसार पात्र आदिवासी अनुदानित शाळांमध्ये भोजन योजना सुरू करण्यासाठी शासनाकडून आवश्यक परवानग्या मागण्यात आल्या आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित शिक्षण विभागाच्या समन्वयाने प्रकल्पाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे महापालिकेच्या शाळांसाठी ९.६३ कोटी; आशा सेविकांना १० हजारांचे दिवाळी बक्षीस, विद्यार्थी दिनही शहरभर साजरा होणार!

मानधनावरील शैक्षणिक कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बक्षीस; लाभार्थी व्यवस्थापन प्रणालीसाठी ६९.५६...

ट्रक टर्मिनससाठी आरक्षित जागेवर पद्मावती मेट्रो स्थानकासाठी महापालिका देणार तेथील ६६५ चौरस मीटर जागा

जागेच्या मोबदल्यात २.३१ कोटींचे आर्थिक समायोजन शहर सुधारणा समितीची मान्यता पुणे,...

पुण्यात दररोज १० हजार विद्यार्थ्यांना अक्षय पात्रकडून मध्यान्ह भोजन

महाराष्ट्रात सहा केंद्रांद्वारे ५४ हजार विद्यार्थ्यांना भोजन; विक्रमगडमध्ये २५...