अजितदादांच्या विमान अपघाताचे सत्य समोर आणा; तपासाला गती देण्याची जय पवारांची मागणी!

Date:

जय अजितदादा पवार यांनी घेतली CID अधिकाऱ्यांची भेट; तपासातील प्रलंबित बाबींचा घेतला आढावा, पारदर्शक आणि विनाविलंब चौकशीची मागणी

पुणे | माय मराठी प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय अजितदादा पवार यांनी बुधवारी (२८ ऑक्टोबर) पुण्यात संबंधित CID अधिकाऱ्यांची भेट घेऊन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत सविस्तर चर्चा केली. या प्रकरणाचा तपास अधिक गतिमान, पारदर्शक आणि विनाविलंब पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली.

या भेटीदरम्यान जय पवार यांनी विमान अपघाताच्या तपासाची सद्यस्थिती, आतापर्यंत झालेली कार्यवाही, तपासातील प्रलंबित बाबी तसेच तपास पूर्ण होण्यासाठी लागणारा संभाव्य कालावधी याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. अपघाताशी संबंधित प्रत्येक महत्त्वाच्या बाबीची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘अजितदादांच्या अपघातामागील सत्य समोर येणे हा लाखो नागरिकांच्या विश्वासाचा विषय’

“अजितदादांच्या विमान अपघातामागील सत्य समोर येणे हा केवळ एका कुटुंबाचा प्रश्न नसून, दादांवर अपार प्रेम करणाऱ्या लाखो नागरिकांच्या विश्वासाचा विषय आहे,” अशी भूमिका जय अजितदादा पवार यांनी मांडली.

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरे मिळणे आणि अपघाताची नेमकी कारणे स्पष्ट होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तपासात कोणतीही दिरंगाई न करता सर्व संबंधित बाबींची गांभीर्याने चौकशी व्हावी, अशी अपेक्षा जय पवार यांनी व्यक्त केली.

तपासातील प्रत्येक बाबीची सखोल चौकशी करण्याची मागणी

विमान अपघाताच्या तपासात कोणतीही महत्त्वाची बाब दुर्लक्षित राहू नये. तपास यंत्रणांनी सर्व उपलब्ध पुरावे आणि संबंधित बाबींची सखोल पडताळणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी. तसेच चौकशीत कोणाची जबाबदारी निश्चित होत असल्यास त्यानुसार आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या भेटीदरम्यान आमदार विक्रम काकडे हे जय पवार यांच्यासोबत उपस्थित होते.

सत्य समोर येईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संपूर्ण सत्य समोर येणे आवश्यक असून, तपास निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण व्हावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असा निर्धार जय अजितदादा पवार यांनी व्यक्त केला.

या भेटीमुळे विमान अपघाताच्या तपासाच्या सद्यस्थितीबाबत आणि पुढील कार्यवाहीबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. तपास यंत्रणांकडून या प्रकरणात पुढे कोणती कार्यवाही केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे महापालिकेच्या दिवाळीच्या सुट्टीत बदल; ६ नोव्हेंबरऐवजी ९ नोव्हेंबरला सुट्टी

पुणे -महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सन २०२६ मध्ये जाहीर...