उद्या पुन्हा जंतरमंतरच्या दिशेने कूच करू सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत तिथेच ठाण मांडू-अजिंक्य शिंदे

Date:

नवी दिल्ली :कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व आता अजिंक्य शिंदे करणार आहेत. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असताना व्हिडीओ शेअर करून ही घोषणा केली. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जंतरमंतर येथे आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या सीजेपीच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आंदोलनाच्या नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर अभिजीत दिपके यांनी अजिंक्य शिंदे यांच्याकडे आंदोलनाची सूत्रे सोपवली. जंतर-मंतरवरील आंदोलन रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईनंतर कॉकरोच जनता पार्टीने पत्रकार परिषद घेत आपले आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी कायम असल्याचे सांगितले आहे.दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर CJPचे प्रमुख नेते आणि हजारो समर्थकांना ताब्यात घेण्यात आले. जंतर-मंतरकडे जाणारे मार्ग बंद करण्यात आले, मेट्रो आणि वाहतुकीवर निर्बंध लावण्यात आले आणि काही भागांतील मोबाइल इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली होती.

CJPच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीही शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार असल्याचे सांगत दिल्ली पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारण्यावर आक्षेप घेतला होता. “मुंबई किंवा बंगळुरूमध्ये आंदोलन करता येते, तर दिल्लीत का नाही?” असा सवालही पक्षाच्या नेत्यांनी उपस्थित केला होता.

पक्षाने मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेबाबत उपस्थित केलेले आक्षेप कायम ठेवले असून निवडणूक व्यवस्थेबाबतचा लढा पुढे चालू ठेवण्याची भूमिका घेतली आहे. निवडणूक आयोगाने मात्र मतदार यादीतील फेरबदलांबाबतचे राजकीय पक्षांचे आरोप फेटाळले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘सरकारची भूमिका गुंडगिरीची’; अभिजीत दीपकेंना ताब्यात घेतल्यावर मनोज जरांगे पाटील आक्रमक

‘लोकशाही मार्गाने होणारी आंदोलने दादागिरीच्या जोरावर मोडण्याचा प्रयत्न’; दिल्ली-मुंबईतील...

हिंदू धर्माविषयीच्या गैरसमजांविरोधात आवाज उठवणे आवश्यक – स्वाती गोयल शर्मा यांचे प्रतिपादन

-अरुंधती फाउंडेशनतर्फे सामूहिक तर्पणातून पूर्वज व हुतात्म्यांना अभिवादन पुणे, दि....

एसआयआरविरोधी आंदोलन पुण्यात चिघळले; ८८ आंदोलक ताब्यात, लष्कर पोलिस ठाण्याबाहेरही घोषणाबाजी

पुणे : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेला...