हिंदू धर्माविषयीच्या गैरसमजांविरोधात आवाज उठवणे आवश्यक – स्वाती गोयल शर्मा यांचे प्रतिपादन

Date:

-अरुंधती फाउंडेशनतर्फे सामूहिक तर्पणातून पूर्वज व हुतात्म्यांना अभिवादन

पुणे, दि. १० : छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हिंदू धर्माविषयी चित्रपटांच्या माध्यमातून अनेक चुकीचे समज पसरवले जात असल्याचा आरोप करत, या प्रवृत्तीविरोधात समाजाने आवाज उठवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शोध पत्रकार स्वाती गोयल शर्मा यांनी केले. हिंदू धर्माविषयी होत असलेल्या आक्षेपार्ह चित्रणाबाबत समाजाने जागरूक राहिले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

अरुंधती फाउंडेशन आणि देव देवेश्वर संस्थान यांच्या वतीने सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या सभागृहात सामूहिक तर्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शंखनाद, ओंकार स्तवन आणि पवित्र मंत्रोच्चारांच्या धार्मिक वातावरणात धर्म व मातृभूमीसाठी बलिदान दिलेल्या पूर्वजांना आणि हुतात्म्यांना तर्पणाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले.

या वेळी ज्येष्ठ विधिज्ञ सदानंद फडके, देव देवेश्वर संस्थानचे रमेश भागवत, अरुंधती फाउंडेशनचे हिमांशू गुप्ते, आदित्य गुप्ते, धर्मशास्त्र संशोधक आर्या जोशी आणि विद्याधर नारगोळकर उपस्थित होते.

स्वाती गोयल शर्मा म्हणाल्या, हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून हिंदू धर्माविषयी चुकीच्या धारणा निर्माण केल्या जात असल्याचे दिसून येते. चित्रपटांमधील धार्मिक विषयांचे चित्रण आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. सेन्सॉर बोर्डाची भूमिका आणि चित्रपटांना दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रांच्या परिणामकारकतेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. ओटीटी माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे चित्रपटांच्या आशयावर नियंत्रण ठेवण्याच्या विद्यमान व्यवस्थेच्या मर्यादा स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.

सामूहिक तर्पणातून धर्मवीरांचे स्मरण

अरुंधती फाउंडेशनचे हिमांशू गुप्ते यांनी कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “हरिद्वार येथे घाटावर सामूहिक तर्पण होताना पाहिल्यानंतर पुण्यातही अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्याची कल्पना सुचली. पुण्याच्या भूमीला शिवकालापासून अनेक धर्मवीरांच्या बलिदानाचा इतिहास लाभला आहे. या वीरांचे सामूहिक स्मरण व्हावे आणि नव्या पिढीला त्यांच्या इतिहासाची व परंपरेची माहिती मिळावी, या उद्देशाने कार्यक्रम आयोजित केला आहे.”

पितृपंधरवड्याबाबतचे गैरसमज दूर करा

ज्येष्ठ विधिज्ञ सदानंद फडके म्हणाले, पितृपंधरवडा अशुभ असतो, ही समजूत चुकीची आहे. हिंदू संस्कृतीत पूर्वजांचे स्मरण आणि त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे पितृपंधरवड्याबाबत मनात असलेले गैरसमज दूर करून या परंपरेकडे योग्य दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात स्वाती गोयल शर्मा यांचा ‘जेम्स ऑफ बॉलीवूड’ हा दृक्-श्राव्य कार्यक्रम सादर करण्यात आला. तसेच अरुंधती फाउंडेशनच्या वतीने स्वाती गोयल शर्मा यांच्या संस्थेला आर्थिक मदत करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरजे बंड्या यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उद्या पुन्हा जंतरमंतरच्या दिशेने कूच करू सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत तिथेच ठाण मांडू-अजिंक्य शिंदे

नवी दिल्ली :कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व आता...

‘सरकारची भूमिका गुंडगिरीची’; अभिजीत दीपकेंना ताब्यात घेतल्यावर मनोज जरांगे पाटील आक्रमक

‘लोकशाही मार्गाने होणारी आंदोलने दादागिरीच्या जोरावर मोडण्याचा प्रयत्न’; दिल्ली-मुंबईतील...

एसआयआरविरोधी आंदोलन पुण्यात चिघळले; ८८ आंदोलक ताब्यात, लष्कर पोलिस ठाण्याबाहेरही घोषणाबाजी

पुणे : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेला...