‘संविधान बचाओ’ विषयावर संविधान चौकात विशेष कार्यक्रम; सौरभ दास यांना विमानतळावर रोखल्याच्या प्रकरणावर काय भूमिका मांडणार, याकडे लक्ष
नागपूर : संविधान दिनाचे औचित्य साधून कॉकरोच जनता पार्टी (Cockroach Janata Party – CJP) च्या वतीने गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी नागपूर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी CJP चे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजित दीपके आणि सहसंयोजक आशुतोष रांका नागपूरला उपस्थित राहणार आहेत.
नागपूर येथील संविधान चौकात दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार असून, यामध्ये ‘संविधान बचाओ’ या विषयावर चर्चा व विचारमंथन करण्यात येणार आहे. संविधानाचे महत्त्व, संवैधानिक मूल्यांचे संरक्षण, लोकशाहीचे बळकटीकरण आणि नागरिकांची जबाबदारी अशा महत्त्वपूर्ण विषयांवर यावेळी विचार मांडले जाणार आहेत.
दरम्यान, ऑक्सफर्ड विद्यापीठातील कार्यक्रमासाठी लंडनला जाणाऱ्या सौरभ दास यांना दिल्ली विमानतळावर रोखण्यात आल्याच्या घटनेनेही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अभिजित दीपके आणि आशुतोष रांका यांची भूमिका काय असेल, तसेच अभिव्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही आणि संवैधानिक अधिकारांबाबत ते काय भाष्य करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या दौऱ्यादरम्यान अभिजित दीपके हे नागपूरमधील विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिकांच्या भेटी घेणार आहेत. या माध्यमातून सामाजिक, लोकशाहीवादी आणि संवैधानिक प्रश्नांवर संवाद साधण्यात येणार आहे.
संविधान दिन हा केवळ उत्सव साजरा करण्याचा दिवस नसून संविधानाने दिलेली मूल्ये, अधिकार आणि कर्तव्ये यांचे स्मरण करून देणारा दिवस आहे. त्यामुळे नागपूरमधील नागरिक, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि संविधानप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे.

