थिंपूतील १५ व्या सावरकर संमेलनात मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे अनावरण; विविध क्षेत्रातील ३६ व्यक्तींच्या प्रेरणादायी यशकथा
पुणे : निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आणि संपादित केलेल्या ‘झेप’ या पुस्तकाचे प्रकाशन भूतानची राजधानी थिंपू येथे नुकत्याच झालेल्या १५ व्या सावरकर संमेलनात करण्यात आले.
संमेलनाचे अध्यक्ष तथा लेखक सुधीर सेवेकर, छत्रपती संभाजीनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळाचे अध्यक्ष भाऊ सुरडकर, भूतानचे प्रा. माधव यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले.
‘झेप’ या पुस्तकात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या व्यक्तींच्या प्रेरणादायी यशकथांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये डॉ. विजय भटकर, डॉ. रघुनाथ शेवगावकर, विकास खारगे, तुकाराम मुंडे, नयना गुंडे, सदानंद शेटे, डॉ. विजय शिरीषकर, सुधाकर तोरणे, दिलीप स्वामी, भावेश भाटिया, अण्णासाहेब टेकाळे आणि राधिका भांडारकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या प्रवासाचा वेध घेण्यात आला आहे.
तसेच आर. आर. लेमाडे, मारुती कदम, राम काजरोळकर, कृष्णा दिवटे, उमाकांत रासने, शरद चौधरी, नंदकुमार पाटील, अमोल मोहोळकर, सुखदा प्रधान सिंग, प्रमोद झिंजाडे, सुभाष खाकाळ, प्रा. डॉ. मनीषा चाळसे, दिलीप पाथरे, अनिल राजपिसे, शोभा जोपुळे, विराग मधुमालती, अश्विनी भोईर, पुनिता भडसावळे, डॉ. श्यामल सरडकर, जे. पी. देसाई, यज्ञेश सावे, अक्षय जाधव, मनीष गवई आणि अलका भुजबळ यांच्या यशकथांचाही पुस्तकात समावेश आहे.
या यशकथा देवेंद्र भुजबळ, प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे, सुनील चिटणीस, नंदकुमार रोपळेकर, महेबूब कासार, नितांत राऊत, रश्मी हेडे आणि विजय होकर्णे यांनी लिहिल्या आहेत.
विविध क्षेत्रांत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचे अनुभव व त्यांचा प्रेरणादायी प्रवास वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न **‘झेप’**मधून करण्यात आला आहे. पुस्तकाचे प्रकाशन न्यूज स्टोरी टुडे यांनी केले आहे.

