आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आता खानावळीसाठी देण्यात येणाऱ्या रकमेत 1050 रुपयांची वाढ :स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले

Date:

आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिलासा; खानावळ अनुदान डीबीटी २१५० वरून ३२०० रुपये करण्याचा निर्णय

पुणे : घोले रोड येथील पुणे महापालिका संचलित डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या खानावळीसाठीच्या थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समिती समोर ठेवण्यात आला होता. सध्या दिली जाणारी २ हजार १५० रुपयांची मासिक रक्कम अपुरी पडत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार लक्षात घेऊन ती ३२०० रुपये देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या या वसतिगृहात सध्या सुमारे ४०० विद्यार्थी विविध शाखांमध्ये शिक्षण घेत आहेत. २०१७ पासून विद्यार्थ्यांना जेवणासाठी २ हजार १५० रुपये डीबीटी दिले जात आहेत. मात्र, वाढती महागाई आणि भोजनाचा वाढलेला खर्च लक्षात घेता ही रक्कम अपुरी असल्याचे विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले होते. विद्यार्थ्यांनी दरमहा ४ हजार १५० रुपयांची मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २६ डिसेंबर २०२४ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार भोजन भत्त्याची मर्यादा लक्षात घेऊन महापालिकेने डीबीटी रक्कम ३ हजार २०० रुपये करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे.

सदर खर्चासाठी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात समाज विकास विभागाच्या विविध अर्थशीर्षकांअंतर्गत एकूण १.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार सध्या प्रवेशित १५७ विद्यार्थ्यांसाठी दरमहा सुमारे ५.०२ लाख रुपये खर्च अपेक्षित असून वार्षिक खर्च सुमारे ४०.१९ लाख रुपये होणार आहे.

डीबीटी वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीमार्फत मुख्य सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असून मंजुरी मिळाल्यानंतर सुधारित रक्कम अंमलात येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

_१८२ उमेदवार निवडणूक रिंगणात _२ हजार ४१९ मतदान केंद्रांवर १०...

५० टक्के शेतकऱ्यांचा विरोध असल्यास टीपी स्कीम रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे!

शेतकऱ्यांवर नगररचना योजना लादणार नाही; PMRDA आयुक्त डॉ. अभिजीत...

पुणे अग्निशमन दलाच्या ९ जवानांची उल्लेखनीय कामगिरी; सहा महिन्यांचे विशेष प्रशिक्षण यशस्वी!

सहा जवान विशेष प्रावीण्यासह, तर तीन जवान विशिष्ट प्रावीण्यासह...

निकृष्ट रस्ते कामांसाठी आता कंत्राटदारांसह महापालिका अधिकारीही जबाबदार; आयुक्तांचे कठोर निर्देश!

पुणे ग्रँड टूर २०२७ साठी रस्ते विकासकामांना गती; बाणेर–गणेशखिंड...