‘अतुलनीय भारत’ विषयावर परदेशी विद्यार्थ्यांची
आयएमईडीमध्ये ‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन स्पर्धा’
पुणे :
भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’(आयएमईडी)मध्ये ‘आंतरराष्ट्रीय विद्यार्थी सेल’च्या वतीने परदेशी विद्यार्थ्यांसाठी ‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन स्पर्धे’चे आयोजन केले होते. स्पर्धेचा विषय ‘अतुलनीय भारत’ हा होता. या स्पर्धेमध्ये एकूण 60 विद्यार्थी सहभागी झाले होते.
‘भारत हा विविधतेने नटलेला देश असून, त्याचे महान पैलू या परदेशी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून पहायला मिळाले. जगाची भारताकडे पाहण्याची दृष्टि लक्षात आली. हे या स्पर्धेचे मोठे यश आहे’, असे प्रतिपादन डॉ. सचिन वेर्णेकर (भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक) यांनी केले.
यावेळी डॉ.अजीत मोरे, राजलक्ष्मी वाघ (आंतरराष्ट्रीय विद्यार्थी सेलच्या प्रमुख), डॉ. भारतभूषण सांक्ये आदी मान्यवर उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.