पुणे भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या तर्फे आयोजित 34व्या ग्लेनमार्क सब-ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत दुस-या दिवशी महाराष्ट्राच्या वेदिका अमिन, संजिती सहा व गोव्याच्या शॉन गांगूली यांनी नव्या विक्रमासह सुवर्ण पदक संपादन केले. 4X50मी मिडले प्रकारात मुलींच्या 11-12 वयोगटात महाराष्ट्रच्या पलक धामी, संजिती सहा, वेदिका अमिन, अपेक्षा फर्नांडीस या संघाने नवा विक्रम नोंदविला.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 200 मीटर मिडले प्रकारात मुलांच्या गटात गोव्याच्या शॉन गांगुलीने 2.23.20सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले व यासह नवा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. याआधी या प्रकारात पश्चिम बंगालच्या स्वदेश मंडल याच्या नावावर 2.26.73सेकंद वेळेचा विक्रम होता. पश्चिम बंगालच्या साहिल लष्कर व कर्नाटक उत्कर्ष पाटील यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. तर मुलींच्या गटात महाराष्ट्रच्या संजिती सहाने 2.38.18सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले तर तामिळनाडूच्या शक्ती बी व महाराष्ट्रच्या अपेक्षा फर्नांडीस यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.
100मी ब्रेसस्ट्रोक प्रकारात मुलांच्या गटात पश्चिम बंगालच्या शुबोजीत गुप्ताने 1.17.56 सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. तर मुलींच्या गटात महाराष्ट्रच्या वेदिका अमिनने 1.18.63सेकंदाचा वेळ नोंदवत नव्या विक्रमासह सुवर्णपदक संपादन केले. वेदिकाने याआधी 1.20.85 सेकंद वेळेचा आपल्याच नावावरील विक्रम मोडीत काढत नवा विक्रम प्रस्थापीत केला. वेदिका मुंबई येथे ओबेरा इंटरनॅशनल स्कुल मध्ये इयत्ता सहावी मध्ये शिकत असून कोटर्स क्लब येथे प्रशिक्षक योगेश कगात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. महाराष्ट्रच्या अपेक्षा फर्नांडीसने 1.22.76सेकंद वेळ नोंदवत रौप्य पदक मिळवले.
100मी फ्रीस्टईल प्रकारात मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या उत्कर्ष गोरने 1.07.14सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण पदकाची कमाई केली तर मुलींच्या गटात आसामच्या जहानबी कश्यपने 1.07.27सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले.
50मी बॅकस्ट्रोक प्रकारात मुलांच्या गटात पश्चिम बंगालच्या साहिल लष्करने स्वताःचाच 31.51सेकंदाचा विक्रम मोडीत काढत 30.96सेकंद वेळेसह सुवर्णपदक संपादन केले. तर मुलींच्या गटात महाराष्ट्रच्या पलक धामीने 33.11सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले.
50मी बटरफ्लाय प्रकारात मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या उत्कर्ष गोरने 32.19सेकंदाचा वेळ नोंदवत सुवर्ण पदक पटकावले तर मुलींच्या गटात कर्नाटकच्या रिशिका मांगलेने 33.39सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले.
50मी फ्रीस्टाईल प्रकारात मुलींच्या 9-10 वयोगटाट महाराष्ट्राच्या वेदिका अमिन व संजिती सहा या दोघींनीहा 28.90सेकंद वेळ नोंदवली त्यामुळे दोघींनाही सुवर्णपदक देण्यात आले. तर हिमाचल प्रदेशच्या नैना ग्रेवालने 29.86 सेकंद वेळेसह कांस्य पदक पटकावले. त्यापुर्वी सकाळी झालेल्या हिट्समध्ये वेदिकाने गुजरातच्या माना पटेलचा 2012चा 0.29.41 सेकंदाचा विक्रम मोडला. सायंकाळी झालेल्या अंतिम फेरीत तीने स्वतःचा विक्रम मोडला. आता हा विक्रम वेदिका व संजिती या दोघींच्याही नावावर नोंदला गेला आहे.
4X50मी मिडले प्रकारात मुलींच्या 11-12 वयोगटात महाराष्ट्रच्या पलक धामी, संजिती सहा, वेदिका अमिन, अपेक्षा फर्नांडीस या संघाने 2.11.34सेकंदासह नवीन विक्रम नोंदवत वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. याआधी महाराष्ट्र संघाचा 2.14.86 सेकंद वेळेचा विक्रम होता.
हाय बोर्ड डायव्हिंग प्रकारात मुलींच्या 14 ते 15 वयोगटात सोलापुरच्या बिल्वा गिरमने 210.30 गुण मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. 14 वर्षीय बिल्वा सेंट जोसेफ हायस्कुलमध्ये 10वी इयत्तेत शिकत असून श्री ऑक्वेटीक क्लबमध्ये प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- 200मी मिडले मुले(11-12 वयोगट)
1.शॉन गांगुली(गोवा, 2.23.20से), 2. साहिल लष्कर(पश्चिम बंगाल, 2.26.02से), 3. उत्कर्ष पाटील(कर्नाटक, 2.35.66से)
200मी मिडले मुली(11-12 वयोगट)- 1. संजिती सहा(महाराष्ट्र, 2.38.18से), 2. शक्ती बालकृष्णन(तामिळनाडू, 2.38.62से), 3. अपेक्षा फर्नांडीस(महाराष्ट्र, 2.40.68से)
100मी ब्रेसस्ट्रोक मुले(11-12 वयोगट)- 1.शुबोजीत गुप्ता(पश्चिम बंगाल, 1.17.56से), 2. सुराबीन रियान(त्रिपुरा, 1.18.18से), 3. आदिथ समरन(कर्नाटक, 1.18.68से)
100मी ब्रेसस्ट्रोक मुली(11-12 वयोगट)-1. वेदिका अमिन(महाराष्ट्र, 1.18.63से), 2. अपेक्षा फर्नांडीस(महाराष्ट्र, 1.22.76से),3. आस्था बोर्दलोई(आसाम, 1.24.50से)
100मी फ्रीस्टाईल मुले(9-10 वयोगट)- 1. उत्कर्ष गोर(महाराष्ट्र, 1.07.14से), 2. एस.अथुबा मैतई(मणिपुर, 1.10.25से), 3. अनिष स्वर्णाकर(पश्चिम बंगाल, 1.10.39से)
100मी फ्रीस्टाईल मुले(9-10 वयोगट)- 1. जहानबी कश्यप(आसाम, 1.07.27से), 2. रिदिमा कुमार(कर्नाटक, 1.08.56से), 3. आश्ना मत्तूर(कर्नाटक, 1.08.96से)
50मी बॅकस्ट्रोक मुले(11-12 वयोगट)- 1.साहिल लष्कर(पश्चिम बंगाल, 30.96से), 2. उत्कर्ष पाटील(कर्नाटक, 32.43से), 3. सानिध्य चौकसी(मध्य प्रदेश, 33.19से)
50मी बॅकस्ट्रोक मुले(11-12 वयोगट)- 1. पलक धामी(महाराष्ट्र, 33.11से), 2. आर्या ठक्कर(गुजरात, 34.30), 3. तनुस्मिता दास(पश्चिम बंगाल, 34.85से)
50मी बटरफ्लाय मुले(9-10 वयोगट)-1. उत्कर्ष गोर(महाराष्ट्र, 32.19से), 2. रॉबीन सेन(दिल्ली, 32.41से), 3. रेनुक चार्या होडमनी(कर्नाटक, 34.00से)
50मी बटरफ्लाय मुली(9-10 वयोगट)-1. रिशिका मांगले(कर्नाटक, 33.39से), 2. जाहानबी कश्यप(आसाम, 34.24), 3. रिदिमा कुमार(कर्नाटक,35.12)
50मी फ्रीस्टाईल मुले(9-10 वयोगट)-1. अनुभव पराशर(आसाम, 27.67से), 2. एम.डी.रहान मिर्झा(आसाम, 28.53से), 3. प्रांजल पात्रा(पश्चिम बंगाल, 29.21से)
50मी फ्रीस्टाईल मुली(9-10 वयोगट)-1. वेदिका अमिन(महाराष्ट्र, 28.90से), 2. संजिती सहा(महाराष्ट्र, 28.90से),3. नैना ग्रेवाल(हिमाचल प्रदेश, 29.86)
4X50मी मिडले मुली(11-12 वयोगट)- 1.महाराष्ट्र(पलक धामी, संजिती सहा, वेदिका अमिन, अपेक्षा फर्नांडीस 2.11.34से), 2.कर्नाटक(निना व्यांकटेश, लतिशा मंडना, समरा चाको, सम्नविता आर, 2.14.44से), 3. आसाम(आंतरीका संस्कृती, लवलीन दास, मनाली मिश्रा, आस्था बोर्दोलोई, 2.20.06से)
हाय बोर्ड मुले(14-15 वयोगट)- 1. एन विल्सन सिंग(एसएससीबी, 291.15), 2. ओम अवस्थि(महाराष्ट्र, 276.20), 3. सतिश कुमार प्रजापती(एसएससीबी, 237.90)
हाय बोर्ड मुली(14-15 वयोगट)- 1. बिल्वा गिरम(महाराष्ट्र, 210.30), 2. ज्योतीश्री लहा(पश्चिं बंगाल, 203.15),3. तितिक्षा मराठे(मध्य प्रदेश, 180.90)
3मी स्प्रिंग बोर्ड मुले(12-13 वयोगट)- 1. वाय. प्रेमसन मैतैई(एसएससीबी, 299.75), 2. प्रखर जोशी(मध्य प्रदेश, 200.70), 3. वाधिर भार्गव(गुजरात, 196.90)
3मी स्प्रिंग बोर्डमुली(12-13 वयोगट)-1. शुभांगी मछरीया(महाराष्ट्र, 177.10), 2. मेगन अल्मेडा(गोवा, 173.70), 3. महक जैन(महाराष्ट्र, 135.95)