पुणे : दौंड तालुक्यातील केडगाव येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन येथे तीन अल्पवयीन आणि एका सज्ञान मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात व्यवस्थापक म्हणून कार्यरत असणाऱ्या भास्कर निरगट्टी (वय-53) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे, आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.अशी माहिती यवत पोलिसांनी दिली आहे.
नुकत्याच धर्म परिवर्तनाच्या मुद्यावरुन विधानसभेत लक्षवेधी ठरलेल्या केडगाव येथील ख्रिश्चन संस्था पंडिता रामाबाई मुक्की मिशन यामध्ये आणखी दुसरा प्रकार घडल्याने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही संस्था अनाथ अंध अपंग मुलींना शिक्षणासाठी रहिवास व मोफत शिक्षण उपलब्ध करुन देते. त्या विद्यार्थिनींचे संगोपन, शिक्षण व नोकरी अशा सर्व गोष्टी संस्थेमार्फत अनेक वर्षापासून केले जात आहे.
संस्थेची खासगी व सरकारी याच परिसरात शाळा आहे. संस्थेमध्ये अनेक महिला राहत असून त्यामध्येच अकाउंट सांभाळणाऱ्या व्यवस्थापकाने विनयभंग केल्याप्रकरणी येथील समुपदेशक म्हणून कार्यरत असलेल्या महिलेने यवत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानंतर दौंडचे उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.गुन्हा 17 एप्रिल रोजी घडला असून 12 जुलै रोजी यवत पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.दौंड तालुक्यातील या प्रकरणाने या संस्थेत काम करणाऱ्या या आरोपीवर कठोर कारवाई
करावी अशी मागणी अनेक सामाजिक संस्थांद्वारे करण्यात आली आहे.