पुणे : लोणीकंद पोलिसांनी भावडी गावच्या हद्दीतील हांडगर वस्तीजवळ इंद्रायणी नदीच्या पात्रातील गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून गावठी दारूसह इतर साहित्य असा 1 लाख 76 हजारांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. आरोपी जिवन राजाराम साठे (वय 25 रा. लोहगाव) याच्याविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातभट्टी दारूचे अवैध धंदे चालु असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. याबाबत पोलीस पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. भावडी गावच्या हद्दीत हांडगर वस्तीजवळ इंद्रायणी नदीच्या पात्रात जिवन साठे याने लावलेल्या हातभट्टीची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हातभट्टी दारूच्या धंद्यावर छापा टाकला. पथकाने 210 लिटर दारु, 30 हजार लिटर रसायन, दारु गाळण्याचे लोखंडी बॅरल असा एकूण 1 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन जागेवर नष्ट केला.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील,पोलीस उपायुक्त परिमंडळ-4 विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडेयांच्या सूचनेनुसार लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर,पोलीस निरीक्षक गुन्हे निलेश निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे
सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस अंमलदार तिकोणे, जगताप, माने चिनके यांच्या पथकाने केली.
लोणीकंद पोलिसांचा इंद्रायणी नदीच्या पात्रातील गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा
Date: