पुणे, 13 जुलै 2024- पूना क्लब लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित चौथ्या पूना क्लब रॅकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत ओबेरॉय अँड निल किंग्ज संघाने 1376 गुणांसह अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
पूना क्लबच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन, स्क्वॅश कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत स्टॅश – प्रो ऑल स्टार्स संघाने 1326 गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला, तर एएसआर स्ट्रायकर्स संघाने 1319 गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला.
अखेरच्या साखळी फेरीत ओबेरॉय अँड निल किंग्ज संघाने एएसआर स्ट्रायकर्स संघाचा 264-239 पराभव करून विजयी मालिका कायम राखली. बॅडमिंटनमध्ये प्रीती सप्रे, अर्जुन मोटाडू, केदार नाडगोंडे, कुमार पी. विवेक, आकाश यांच्या विजयी खेळीच्या जोरावर किंग्ज संघाने स्ट्रायकर्स संघाचा 71-65 असा तर, स्क्वॅशमध्ये क्रिश, याने केलेल्या कामगिरीच्या जोरावर किंग्ज संघाने स्ट्रायकर्स संघाचा 44-43 असा पराभव केला. टेबल टेनिसमध्ये अर्जुन, विक्रम, आर्यन कीर्तने, यांच्या विजयी खेळीच्या जोरावर किंग्ज संघाने स्ट्रायकर्स 63-34 असा तर, टेनिसमध्ये किंग्ज संघाने स्ट्रायकर्स संघाचा 58-50 असा पराभव करून संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. अखेरच्या पिकल बॉलच्या लढतीत किंग्जला स्ट्रायकर्सने 28-47 असे पराभूत केले.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्टॅश – प्रो ऑल स्टार्सच्या मृणाल शहा याला मालिकावीर हा पुरस्कार देण्यात आला. स्पर्धेला ग्रॅव्हीटस फाऊंडेशनयांचे मुख्य प्रायोजकत्व तर, कॉन्व्हेकस यांचे सहप्रायोजकत्व लाभले होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पूना क्लब लिमिटेडचे अध्यक्ष सुनील हांडा, उपाध्यक्ष गौरव गढोक, पूना क्लब लिमिटेडच्या रॅकेट स्पोर्ट्स समितीचे अध्यक्ष आणि या लीगचे चेअरमन अमेय कुलकर्णी, क्लब समिती सदस्य व स्पर्धा संयोजन समिती सदस्य आदित्य कानिटकर, विराफ देबू, पंकज शहा, अमित परमार, तुषार आसवानी, शैलेश रांका, समीर संघवी, कुणाल संघवी यांच्या हस्ते करण्यात आले.
निकाल: साखळी फेरी:
ओबेरॉय अँड निल किंग्ज वि.वि.एएसआर स्ट्रायकर्स 264-239
बॅडमिंटन: ओबेरॉय अँड निल किंग्ज वि.वि.एएसआर स्ट्रायकर्स 71-65;
स्क्वॅश: ओबेरॉय अँड निल किंग्ज वि.वि.एएसआर स्ट्रायकर्स 44-43;
टेबल टेनिस: ओबेरॉय अँड निल किंग्ज वि.वि.एएसआर स्ट्रायकर्स 63-34;
टेनिस: ओबेरॉय अँड निल किंग्ज वि.वि.एएसआर स्ट्रायकर्स 58-50;
पिकल बॉल: ओबेरॉय अँड निल किंग्ज पराभुत वि.एएसआर स्ट्रायकर्स 28-47;
एचके पॉवर हाऊस वि.वि.मानव ऍव्हेंजर्स 252-228
बॅडमिंटन:एचके पॉवर हाऊस पराभुत वि.मानव ऍव्हेंजर्स 49-71;
स्क्वॅश:एचके पॉवर हाऊस पराभुत वि.मानव ऍव्हेंजर्स 45-49;
टेबल टेनिस: एचके पॉवर हाऊस वि.वि.मानव ऍव्हेंजर्स 61-60;
टेनिस: एचके पॉवर हाऊस वि.वि.मानव ऍव्हेंजर्स 50-34;
पिकल बॉल: एचके पॉवर हाऊस वि.वि.मानव ऍव्हेंजर्स 47-14;
स्टॅश – प्रो ऑल स्टार्स वि.वि.कॉन्व्हेकस शार्क्स 307-190
बॅडमिंटन: स्टॅश – प्रो ऑल स्टार्स वि.वि.कॉन्व्हेकस शार्क्स 67-43;
स्क्वॅश: स्टॅश – प्रो ऑल स्टार्स वि.वि.कॉन्व्हेकस शार्क्स 63-39;
टेबल टेनिस: स्टॅश – प्रो ऑल स्टार्स वि.वि.कॉन्व्हेकस शार्क्स 74-38;
टेनिस: स्टॅश – प्रो ऑल स्टार्स वि.वि.कॉन्व्हेकस शार्क्स 60-40;
पिकल बॉल: स्टॅश – प्रो ऑल स्टार्स वि.वि.कॉन्व्हेकस शार्क्स 43-30