पतित पावन च्या निवेदना नंतर पुरातत्व खात्याने फुले वाड्यातील वाटपौर्णिमा सणासाठी दिलेले निर्बंध रद्द केले:PPS चा दावा

Date:

पुणे, दि. २६ जून : पतित पावन च्या निवेदना नंतर पुरातत्व खात्याने फुले वाड्यातील वाटपौर्णिमा सणासाठी दिलेले निर्बंध रद्द केले अशी माहिती येथे संघटनेचे स्वप्नील नाईक यांनी दिली आहे .

त्यांनी असेही म्हटले आहे कि,’महात्मा फुले वाडा येथे वटपौर्णिमा/वटसावित्री निमित्त धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यास विरोध करणाऱ्या निवेदनावर पतित पावन संघटनेने पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, पुणे विभाग यांच्याकडे सविस्तर लेखी आक्षेप नोंदवून संबंधित निवेदनाची वस्तुनिष्ठ चौकशी करण्याची मागणी केली आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, भारतीय राज्यघटनेच्या कलम २५ व २६ नुसार प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचे पालन, आचरण आणि प्रसार करण्याचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे कोणत्याही एका विचारसरणीच्या दबावाखाली हिंदू धार्मिक परंपरांवर निर्बंध आणण्याचा प्रयत्न हा संविधानविरोधी असून सर्व धर्मांना समान न्याय देण्याच्या तत्त्वालाही बाधा पोहोचवणारा आहे.


पतित पावन संघटनेने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजसुधारणेचे कार्य केले परंतू त्यांनी भारतीय संस्कृती किंवा धार्मिक परंपरांचा विरोध केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या नावाचा आधार घेऊन वटसावित्रीसारख्या पारंपरिक धार्मिक उत्सवाला विरोध करणे हे ऐतिहासिकदृष्ट्या व वैचारिकदृष्ट्या चुकीचे असल्याचे संघटनेचे मत आहे.
संघटनेने प्रशासनाकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
महात्मा फुले वाडा येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून वटसावित्रीसह धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी.
हिंदू धार्मिक परंपरांविरोधात करण्यात आलेल्या निवेदनाची निष्पक्ष चौकशी करावी.
संविधानिक अधिकारांवर गदा आणणाऱ्या मागण्यांना प्रशासनाने मान्यता देऊ नये.
कोणत्याही एका विचारसरणीच्या दबावाला बळी न पडता सर्व नागरिकांना समान न्याय द्यावा.
हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी अथवा सामाजिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करणाऱ्यांविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी.
पतित पावन संघटनेने इशारा दिला आहे की, प्रशासनाने या प्रकरणात निष्पक्ष भूमिका घेऊन कायदा व संविधानानुसार निर्णय घ्यावा. अन्यथा हिंदू समाजाच्या संविधानिक आणि धार्मिक अधिकारांच्या संरक्षणासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
असे निवेदन पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक देण्यात आले त्यावेळी संघटनेचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष श्री स्वप्निल नाईक, महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रवीण झंवर, महाराष्ट्र सरचिटणीस धनंजय क्षीरसागर, पुणे जिल्हा व शहराध्यक्ष श्री मनोज पवार, पुणे शहर कार्याध्यक्ष श्री संतोष शेंडगे, पुणे शहर सरचिटणीस श्री गुरु कोळी, पुणे शहर उपाध्यक्ष श्री विराज सांगळे, श्री अशोक परदेशी, श्री अजय कवठे, सहसरचिटणीस राजाभाऊ कारकूड, पुणे शहर संपर्कप्रमुख स्वप्निल आंग्रे, सहसंपर्कप्रमुख श्री शशिकांत तोडकर यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सामाजिक न्याय भवनामध्ये गटई कामगारांना स्टॉलचे वितरण

पुणे, दि. २७ जून : अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील...

आहार व बोलण्यावरील संयमाने मिळते ‘स्वास्थ्य आणि मनःशांती’

गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांचे आवाहन  श्री सरस्वती कराड...

 श्रीकृष्णाच्या लीलांचे मनोहारी दर्शन

रोमा परांजपे यांच्या ‘सर्वं कृष्णार्पणम्‌’ सादरीकरणाला रसिकांची दाद पुणे :...