फॅशन इंडस्ट्रीची काळी बाजू दाखवणारी कथा असलेल्या – प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या आगामी ‘कॅलेंडर गर्ल’ या हिंदी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. ‘कॅलेंडर गर्ल’ 7 ऑगस्ट 2015 रोजी प्रदर्शित होणार आहे.फॅशन आणि हिरोईनमध्ये ग्लॅमर जगतावर प्रकाशझोत टाकल्यानंतर ‘कॅलेंडर गर्ल’च्या माध्यमातून ते पुन्हा फॅशन इंडस्ट्रीची काळी बाजू दाखवणार आहेत. कॅलेंडर गर्ल झाल्यानंतर 5 सुपरमॉडेल्सच्या आयुष्यात झालेला आमूलाग्र बदल हा चित्रपटाचा मूळ विषय असेल.आकांक्षा पुरी, रुही सिंग, अवनी मोदी, सतरुपा पायने, कायरा दत्त या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. फोटोग्राफ परफेक्ट असतात, कारण त्यात स्थैर्य असतं, मात्र आयुष्य कधीच एका जागी थांबत नाही, ही ‘कॅलेंडर गर्ल्स’च्या टीझरची टॅगलाईन आहे.