पुणे-मुंबई-बंगळूर महामार्गावर पुण्यातील कात्रजजवळील नवीन बोगद्यात दुधाच्या टँकरला आग लागली. ही घटना गुरुवारी सकाळी घडली.पुण्याकडून साता-याकडे जाणा-या बोगद्यात दुधाच्या टँकरचा टायर फुटला आणि टँकर बाजूला जावून धडकला. दुधाच्या टँकरमधील केबीनला आग लागली. ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत त्वरित खाली उडी मारल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी सिंहगड रोड अग्निशामक दलाची गाडी दाखल झाली आणि आग आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले आहे. आगीत टँकरच्या केबीनचे नुकसान झाले आहे यामुळे पुण्याकडून साता-याकडे जाणा-या मार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.