पुणे-
गुरुनानक पब्लिक स्कूल आणि जुनिअर कॉलेजच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील वार्षिक
स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले . पुणे कॅम्पमधील नेहरू मेमोरिअल हॉलमध्ये झालेल्या या स्नेहसंमेलन
कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे गुरुनानक हायस्कूलचे चेअरमन सरदार संतसिंग मोखा , गुरुनानक पब्लिक स्कूल
आणि जुनिअर कॉलेजचे चेअरमन सरदार प्रकाशसिंग घई , पुणे कॅम्प सिख असोसिएशनचे अध्यक्ष सरदार
हरमिंदरसिंग घई , गुरुनानक पब्लिक स्कूल आणि जुनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सुबिनकौर जग्गी ,
अडमिनेस्ट्रेटर भूपिंदरकौर सहानी , गुरुनानक पब्लिक स्कूल आणि जुनिअर कॉलेजचे संपूर्ण व्यवस्थापन
समिती वर्ग उपस्थित होते .
या स्नेहसंमेलन कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम शाळेच्या बालकलाकारांनी सादर केले . त्याचबरोबर
विद्यार्थ्यांनी दोन नाटिका सादर केल्या . त्यातून समाजामध्ये एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला . मागील
वर्षीमधील गुणवंत विद्यार्थ्याचा रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले .
शाळेच्या मागील वर्षीच्या शैक्षणिक कार्याचे अहवालाचे वाचन गुरुनानक पब्लिक स्कूल आणि जुनिअर
कॉलेजच्या मुख्याध्यापिका सुबिनकौर जग्गी यांनी केले . या स्नेहसंमेलन कार्यक्रमाची सांगता बहारदार
पारंपारिक भांगडा नृत्य विद्यार्थ्यानी सादर करून झाली .