सोशल मिडिया साईटवर अपडेट असण ही सध्याच्या युथची अगदी महत्वाची गरज झाली आहे. नेहमीच्या धकाधकीच्या जीवनात घडणाऱ्या लहान सहान गोष्टींचीही अपडेट आजची तरुणाई सोशल साईटवर देत असते. आजच्या तरुणाईचा सोशल साईटवरचा सगळ्यात आवडता शब्द म्हणजे ऑनलाईन. सिनेमात नेहमीच समाजाचं प्रतिबिंब दिसत अस म्हटलं जात या सोशल मिडियावर आधारित असलेला ऑनलाईन बिनलाईन सिनेमा ३ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सध्या मराठी सिनेसृष्टीत चाकोरी बाहेरचे विषय हाताळले जात आहेत. सिनेमाच्या नावावरूनच सिनेमाचा विषय वेगळा असणार आहे
मराठी सिनेसृष्टीतले जय- वीरू म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर आणि हेमंत ढोमे हे या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या दोघांसोबतच
ऋतुजा शिंदे हा नवा चेहरा मराठीसृष्टीत पदार्पण करतोय. ऋतुजा शिंदे यांचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. आजच्या तरुण पिढीच्या इंटरनेट व्यसनावर हा सिनेमा असून केदार गायकवाड यांनी सिनेमाच दिग्दर्शन केलं आहे, सिनेमाची निर्मिती श्रेयस जाधव आणि नीता जाधव यांनी केली आहे.
ऋषिकेश रानडे, जसराज जोशी, सौरभ या तिघांनी मिळून सिनेमा संगीत दिल आहे. २००१ साली हिट झालेलं ‘ओहो काय झालं’ हे पॉप सॉंगही आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे गाणं हरिहरन यांनी गायल असून संगीत लेस्ली लुईस यांनी दिल आहे. “ऑनलाईन बिनलाईन” सिनेमाचा एक वेगळाच विषय आणि हटके टायटल असलेल्या या सिनेमाकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत.