मल्याळम मधील शटर या सुपरहिट सिनेमाचा रिमेक त्याच नावाने मराठीत होत आहे. उत्कंठा वाढवणारा शटर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ३ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शितहोणाऱ्या या सिनेमाबाबतची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. सिनेमात रहस्य, रोमांच यासारख्या मनोरंजनाचा तडका लावणाऱ्या झकास गोष्टी असल्यामुळे सगळ्यांच्याच नजरा या सिनेमाकडे लागल्या आहेत. बहुचर्चित असा शटर सिनेमा ३ जुलै रोजी सर्वत्र महाराष्ट्भर प्रदर्शित होत आहे. मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध लेखक जॉन मेथ्यू यांनी सिनेमाची कथा लिहिली आहे. त्यांची हिच कथा प्रेक्षकाच्या पारंमपारिक विचारांचे शटर उघडेल आणि त्यांना एका नव्या दृष्टीकोनातून समाजात घडणाऱ्या घटनांकडे पाहण्याची दृष्टी देईल. एका शटरमध्ये अडकलेल्या अनोळखी स्त्री पुरुषाची कहाणी सिनेमाचा गाभा आहे. सिलिकॉन मिडिया ट्रेंड्स अॅडफिल्म मेकर्स प्रा. लि. यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात अभिनेता सचिन खेडेकर आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा एकत्र पाहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेच्या माध्यमातून घरा घरात पोहोचलेला कैवल्य म्हणजेच अमेय वाघ भूमिका सिनेमात विशेष मायने ठेवतो. मराठी सिनेसृष्टीत निर्माण होणारे आशयघन आणि उत्तमरित्या हाताळले जाणारे सिनेमे त्यांची प्रादेशिकता ओलांडत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शटर हा सिनेमा. या सिनेमाचे दिग्दर्शक व्ही.के.प्रकाश हे स्वतःराष्ट्रीय पुरस्कार विजेते असून पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी आजपर्यंत २० सिनेमे केलेआहेत. शटरच्या निमित्ताने त्यांचे हे मराठीत पहिले पदार्पणआहे. मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेता प्रकाश बरे यांनी सिनेमात विशेष भूमिका बजावलीआहे. मंगेश कांगणे आणि अश्विनी शेंडे यांनी ;सिनेमाची हृदयस्पर्शी गीते लिहिली असून पंकज पडघन यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. रोहित राऊतने आपल्या गस्ट या बॅंडसोबत सिनेमात परफॉर्मन्स दिला आहे. दिग्गज अॅड फिल्म मेकर, अभिनेते आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक व्ही . के. प्रकाश (व्हीकेपी) मल्याळम, कन्नड तेलुगु, हिंदी, इंग्रजी या भाषांमध्ये अनेक वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवल्यानंतर शटर या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या सिनेमाची खासियत म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने दक्षिणेतले अनेक तंत्रज्ञही मराठीत पहिल्यांदाच काम करीत आहेत. कोणत्याही सेट शिवाय एकाच वेळी फक्त दोन कॅमेरे वापरून या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. शटर हा सिनेमा एका मध्यमवयीन व्यक्तीची कथा आहे. चार व्यक्तींबरोबर २४ तासांत घडलेल्या अनपेक्षित घटनांचे चित्रिकरण सिनेमात करण्यात आले आहे. अमेय वाघ, प्रकाश बरे, राधिका हर्षे, कमलेश सावंत,जयवंत वाडकर, कौमुदी वाळोकर हे कलाकारही आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहेत. संजीव एमपी आणि प्रकाश बरे यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून पटकथा आणि संवाद मनिषा कोरडे यांनी लिहिले आहेत. के. के. मनोज यांनी सिनेमाच्या छायाचित्रीकरण केले असून भक्ती मायाळू यांनी संकलन केले आहे. रहस्य, रोमांच, सामाजिक उपहास अशी बांधणी असलेला शटर हा सिनेमा ३ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.