नवी दिल्ली – पुणे महानगरपालिकेच्या सॅनिटेशन प्रोग्राम व कम्युनिटी टॉयलेट अंमलबजावणीबाबत
पंतप्रधानांकडून प्रशंसा करण्यात आली आहे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी कार्यक्रम प्रसंगी भारत सरकारच्या वतीने तीन योजनेचा आरंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते करण्यात आला.
देशातील शहरी भागाच्या विकासासाठी आखलेल्या तीन महत्वाच्या योजनांना आजपासून प्रारंभ झाला. यामध्ये स्मार्ट सिटी योजना, पाचशे गावांच्या विकासासाठी अमृत योजना आणि गृहनिर्माणाची योजना अशा या तीन योजना आहेत.
स्मार्ट सिटी योजने अंतर्गत शंभर शहरांचा सर्वांगीण विकास केला जाणार असून अमृत योजनेतून पाचशे शहरांचा पायाभूत विकास करण्याची योजना आहे.
कार्यक्रम प्रसंगी अयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाच्या विविध स्टॉल्सना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटी दिल्या. पुणे महापालिकेच्या स्टॉल्सला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिल्यानंतर महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्मार्ट सिटी योजने अंतर्गत पुणे शहरातील विविध विकास कामांची माहितीसह पुणे शहरात राबविण्यात येत असलेल्या व पुढील कालावधीकरिता यशस्वी नियोजन करण्यात आलेल्या पुणे शहरातील सॅनिटेशन प्रोग्राम व कम्युनिटी टॉयलेट संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती देताना महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले की, पुणे शहरात राबविण्यात येत असलेल्या सॅनिटेशन प्रोग्राम व कम्युनिटी टॉयलेट- सार्वजनिक शौचालया संदर्भात प्रशासनासह स्वयंसेवी संस्था व नागरिकांच्या सहभागाने तसेच सीएसआर(कम्युनिटी सोशल रिस्पॉन्सबिलीटी) अंतर्गत विविध कंपन्या, संस्था व नागरी सहभाग पुणे शहरात अतिशय उल्लेखनियरित्या कार्यरत असल्याचे सांगितले
स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने १९९९ पासून ते आजपर्यंत ८५८ ब्लॉक विकसित व पुर्ननिर्मित, पुनरुज्जीवित व वापरायोग्य करण्यात आले आहेत. यामध्ये सुमारे १५००० पेक्षा अधिक सीटस आहेत. तर १२०० पेक्षा अधिक सीटस सार्वजनिक शौंचालयाचे ठिकाणच्या वापरायोग्य केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे महिलांकरिता स्वतंत्र शौचालयाच्या निर्मितीकरिता मनपाने यशस्वी प्रयत्न केलेले आहेत.
यामध्ये स्त्रिया व पुरुषांकरिता (पब्लिक युरिनल्स) १५०० सीटस यांचा सहभाग आहे. महिलांकरिता टॉयलेट १४९ ब्लॉक असून ४४९ सीटस आहेत.
मुंबई उच्च न्यायालयात एका सुनावणी प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महानगरपालिकेच्या या चांगल्या यशस्वी सेवेची दखल घेऊन “पुणे मॉडेल” सर्वत्र राबविले जावे असे मत नोंदविले आहे. तसेच सीएसआर अंतर्गत सुमारे १०० मनपा शाळांमधून शौचालयांच्या संदर्भात कामे होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या संदर्भातील मनपाने तयार केलेल्या माहितीचे एकत्रित पोस्टर्सबाबत भारत सरकारने स्वत: दखल घेऊन सदरचे पोस्टर्स छापून भारतातील सर्व शहरांना पाठविले आहे. ही पुणे मनपाच्या दृष्टीने आत्यंतिक कौतुकाची बाब असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले.
या संपूर्ण माहिती व यशस्वितेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे महापालिकेच्या या योजना व यशस्वितेबाबत प्रशांसोद्गार काढले.
याप्रसंगी भारतामधील विविध महापालिकांचे महापौर, आयुक्त तसेच राज्यस्तरावील या विषयाशी निगडीत अधिकारी यांचा सहभाग होता.